Download App

पुणे पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा केला पर्दाफाश; पाचजण अटक, 10 लाख 35 हजार रुपये जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, सहकारनगर पोलीस स्टेशनचे तपास पथक पद्मावती भागात गस्त घालत होते. त्यावेळी पद्मावती बस

  • Written By: Last Updated:

Fake Currency Notes In Pune : बनावट नोटांचे रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. (Pune) सहकारनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून पाचशे रुपयांच्या 10 लाख 35 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

बनावट नोटांचे रॅकट उद्धवस्त, NIA कडून महाराष्ट्रासह चार राज्यांत छामेमारी

बनावट नोटप्रकरणी दिल्ली सह, गाझियाबाद आणि मुंबई कनेक्शन उघडकीस आले आहे. दिल्लीतून आणलेल्या तब्बल साडेदहा लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. नीलेश वीरकर, सैफान पटेल, अफजल शहा, शाहीद जक्की कुरेशी, शाहफहड अन्सारी अशी अटक केलेल्यांची नावं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सहकारनगर पोलीस स्टेशनचे तपास पथक पद्मावती भागात गस्त घालत होते. त्यावेळी पद्मावती बस स्थानकाजवळ पोलिसांना पाहून एका तरुणाने स्वारगेटच्या दिशेने धूम ठोकली. पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले आणि त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या खिशात पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल मिळाले. रात्री अंधाराचा फायदा घेऊन बनावट नोटा वटविण्याच्या प्रयत्न हा तरुण करत होता. या तरुणांची चौकशी केली असता त्याने शाहीद कुरेशी, सैफान पटेल, अफजल शहा यांनी या नोटा दिल्याचं सांगितलं.

पोलिसांनी त्यानंतर तपासाची चक्र फिरवत वीरकरला नवी मुंबई येथे नेले. तिथून शाहीद याला अटक केली. या चौकशीत अन्सारीने त्याला बनावट नोटा दिल्याची माहिती दिली. सहकारनगर पोलिसांनी एक-एक साखळी जोडत पाच जणांना अटक केली. यासर्व आरोपींकडून 10 लाख 35 हजार रुपयांच्या पाचशेच्या दोन हजार नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व बनावट नोटा दिल्ली, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून आणल्याचे सांगितले. या आरोपींनी प्राथमिक तपासात सांगितल्यातून पोलीस अधिक तपास करत आहे.

follow us