Download App

मोठी बातमी! पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडी अधिकाऱ्यांकडून अटक

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांच्या घडी ईडीक़डून छापा टाकण्यात आला होता.

  • Written By: Last Updated:

Mangaldas Bandal arrested by ED : पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. बादल यांच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर आणि पुण्यातील महमंदवाडी ( ता.हवेली) येथील निवासस्थानांवर सक्तवसुली संचनालयाने ( ईडी ) मंगळवारी छापे टाकले होते. यानंतर 16 तासांहून अधिक चौकशीनंतर (Mangaldas Bandal) मंगलदास बांदल यांना अखेर ईडीने अटक केली आहे.

Sexual Assault : हे कुठं थांबणार? अश्लील व्हिडीओ दाखवत शिक्षकाकडून विद्यार्थिनींचा लैंगिक छळ

सोळा तास चाललेल्या या कारवाईत बांदल यांच्या घरात पाच कोटी साठ लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडे पाच आलिशान गाड्या, एक कोटींची चार घड्याळेही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आज त्यांना मुंबईच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

Badlapur School Case : राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, बदलापूर प्रकरणात SIT स्थापन

बांदल यांच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर आणि पुण्यातील महमंदवाडी (ता.हवेली) येथील निवासस्थानांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते. यावेळी शिक्रापूर येथील घरी बांदल यांच्या पत्नी रेखाताई बांदल, दोन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली. तर, महंमदवाडी येथील बंगल्यात मंगलदास बांदल यांची चौकशी ईडी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

follow us

संबंधित बातम्या