Download App

तौरल इंडियाने केली मदत! बीड पूरग्रस्तांना जीवनावश्यक किट्स वितरित

बीड जिल्ह्यातील अनेक गावांतील नागरिकांना तौरल इंडिया कंपनीकडून जीवनावश्यक किट्सचे वाटप करण्यात आले.

Taural India Distributed kits To Beed Flood Victims : बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे उभी पिकं पाण्याखाली गेलेली आहेत. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. पशुधनालाही मोठा फटका बसला आहे. 21 सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे परंडा आणि भूम तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे .बीड जिल्ह्यातील मांजरा नदीच्या पुरामुळे फटका बसलेल्या बीड जिल्ह्यातील अनेक गावांतील नागरिकांना तौरल इंडिया कंपनीकडून जीवनावश्यक किट्सचे वाटप करण्यात आले.

संकटाच्या काळात साथ

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातून तातडीने टीम (Pune‘s Taural India) रवाना झाली. पूरग्रस्त गावांमध्ये धान्य व आवश्यक वस्तू असलेले किट्स पोहोचवण्यात (Beed Flood) आले. या मदतीमुळे गावकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

संकटाच्या काळात साथ

भरत गीते म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकरी व नागरिकांना संकटाच्या काळात साथ देणं, (Beed) ही आमची सामाजिक जबाबदारी आहे. मराठवाडा पुन्हा नव्या जोमाने उभा राहील, याची मला खात्री आहे. तौरल इंडियाच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून, कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत एक (Heavy Rain) आदर्श घालून दिला आहे.

नागरिकांचे जीवन अत्यंत विस्कळीत

अचानक आलेल्या पूरामुळे नागरिक अडकले होते. एनडीआरएफच्या पथकाने सुरक्षिततेसाठी तातडीने धाव घेतली. आतापर्यंत अनेक कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मात्र, अजूनही काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांचे जीवन अत्यंत विस्कळीत झाले आहे, तसेच प्रशासन व बचाव यंत्रणा सतर्क आहेत.

follow us