Download App

Radhakrishna Vikhe: हजार रुपयात घरपोच वाळू; महसूलमंत्री विखेंची मोठी घोषणा

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : वाळूचे लिलाव कायमस्वरूपी बंद केले. त्या ठिकाणची ठेकेदारी आपण बंद केली. आता सरकार वाळू थेट जनतेला विकणार आहे. यामुळे कमी पैशात जनतेला वाळू उपलब्ध होईल. केवळ एक हजार रुपयात जनतेला घरपोच वाळू देणार आहे, अशी घोषणा मी उद्या विधानसभेत करणार आहे, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले आहे. वर्षभरात या भागातील जनतेला साकळाई योजनेचे पाणी दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, अशी ग्वाहीही विखे यांनी दिली आहे.

साकळाई उपसासिंचन योजना मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृतज्ञता सोहळ्यात महसूलमंत्री विखे बोलत होते.

आपण हे फक्त गरीब लोकांसाठी करत आहोत. राज्यातील गरिबातील गरीब लोकांना वाळू भेटेल, या वाळूमुळे गुन्हेगारी वाढली, लोक देशोधडीला लागले, अनेकांचे संसार उध्वस्त झाले. त्यामुळे हे सर्व कमी करण्याचे महसूलमंत्री म्हणून माझी जबाबदारी असल्याचे विखे म्हणाले.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 10 ते 12 आमदार फुटणार; मंत्री सामंतांचा खळबळजनक दावा 

तसेच मागील वर्षभरापासून जिल्ह्यातील ज्या मोजण्यामागे पडल्या आहेत. त्या जमिनीच्या मोजण्या पुढच्या दोन महिन्यात पूर्ण करून नकाशे तुमच्या घर पोहच केले जातील. तसेच यापुढे जो जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज करेल त्याला दोन महिन्यात मोजणी करून नकाशे देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. आता लोक मोजणीला येणार नाही. रोवर नावाच्या मशीनद्वारे एक तासात जमिनीची मोजणी करून मिळेल.

 

 

 

 

 

Tags

follow us