राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 10 ते 12 आमदार फुटणार; मंत्री सामंतांचा खळबळजनक दावा

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 10 ते 12 आमदार फुटणार; मंत्री सामंतांचा खळबळजनक दावा

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) बंडखोरीच्या पक्षप्रवेशाच्या घटना सातत्याने घडत असतानाच आता शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी महाविकास आघाडीचे दहा ते बारा आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले आहे.

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र श्रीकांत देसाई आणि माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर काहीच दिवसात सामंत यांनी हे वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

वाचा : व्हीपच्या भांडणावर उदय सामंत स्पष्टच बोलले; म्हणाले, व्हीप फक्त..

सामंत म्हणाले, की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उरलेले जे आहेत जे आहेत यांच्यापैकी अनेक आमदार शिंदे यांच्या संपर्कात आहेत. येत्या काही दिवसात ते देखील धमाके लवकरच होतील. त्या आकड्यावर मी ठाम आहे. साधारण दहा ते बारा आमदार हे शिंदेंच्या संपर्कात आहेत. हे मी मागील दोन महिन्यांपासून सांगत आहे आणि टप्प्याटप्प्याने ते ही लक्षात येईल असे सामंत म्हणाले.

Legislative Council : कोकण.. शिंदे, फडणवीसांचेच.. विधानपरिषद निकालावर उदय सामंत यांची प्रतिक्रिया

हे आमदार शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यामुळे लवकरच ते शिंदे गटात प्रवेश करतील असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अद्याप महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेआधीच सामंत यांनी हे वक्तव्य  केले आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube