Legislative Council : ‘कोकण.. शिंदे – फडणवीसांचेच” विधानपरिषद निकालावर उदय सामंत यांची प्रतिक्रिया

  • Written By: Published:
Legislative Council : ‘कोकण.. शिंदे – फडणवीसांचेच” विधानपरिषद निकालावर उदय सामंत यांची प्रतिक्रिया

‘कोकण.. शिंदे – फडणवीसांचेच” अशी प्रतिक्रिया कोकण शिक्षक मतदार संघाच्या विजयावर मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

कोकण बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचा बालेकिल्ला असल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. हा विजय म्हणजे पुढच्या निवडणुकीची नांदी आहे. अशा आशयाचे ट्विट उदय सामंत यांनी केलं आहे.

अमोल मिटकरी यांच खोचक ट्वीट!

कोकणच्या विजयावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक टीका केली आहे.

त्यांनी एक ट्विट केले असून टाय ट्विटमध्ये त्यांनी लिहले आहे की “कोकण पदवीधर मतदार संघात ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून आले प्रथम त्यांचे अभिनंदन. EVM पेक्षा बॅलेट वर सुद्धा भाजप निवडणूक जिंकू शकते हे सिद्ध झाले. इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका भाजपाने EVM ऐवजी बॅलेट वर घेण्याचे औदार्य दाखवावे.”

 

दरम्यान कोकणात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. म्हात्रे यांना पहिल्या फेरीत त्यांना तब्बल 22 हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांचा विजय नक्की झाला. शेकापच्या बाळाराम पाटील यांनी पराभव स्वीकारला आहे. बाळाराम पाटील यांना फक्त ९ हजार ७०० मते मिळाली आहेत.

हा विजय माझ्या एकट्याचा नसून सर्व शिक्षकांचा आहे. गेल्या ६ वर्षांतल्या कामाची पोचपावती शिक्षकांनी दिली आहे. अशी प्रतिक्रिया कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली आहे. विजयानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “मला ३३ संघटनांचा मला पाठिंबा होता. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आज सुफळ झालाय. त्यावरच आज हा विजय झाला आहे.”

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube