Download App

BJP : मंत्री विखेंची अशोक चव्हाणांना भाजप प्रवेशाची ऑफर; म्हणाले, काँग्रेससाठी..

BJP : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी आली आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना भाजपमध्ये (Radhakrishna Vikhe Offers Ashok Chavan join bjp) येण्याची ऑफर दिली आहे.

मंत्री विखे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले,की सध्या अशोक चव्हाण ज्या पक्षात आहेत त्या काँग्रेस पक्षाचे भवितव्य काय आहे. नाशिकमध्ये जी निवडणूक झाली ती व्यक्तिगत अजेंड्यावर झाली तिथे पक्षाचा विचार कुठे झाला, पक्षाचा विचार करण्यासाठी पक्षात वेळ कुणाला आहे, असा सवाल विखे यांनी केला. ते पुढे म्हणाले, की अशोक चव्हाण हे सक्षम नेते आहेत. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरही काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) नेतृत्व देशानेच नाही तर जगानेही स्वीकारले आहे.त्यांच्या नेतृत्वात काम करणे सगळ्यांनाच आवडेल तेव्हा अशोक चव्हाण यांनीही याचा विचार करावा, अशा शब्दांत मंत्री विखे पाटील यांनी चव्हाण यांना अप्रत्यक्षपणे भाजपात येण्याची ऑफर दिली.त्यांच्या या वक्तव्यावर अद्याप चव्हाण यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा : महसूल मंत्री विखे पाटलांनी आज कोणालाचं नाही सोडलं… 

दरम्यान,कालच भारत जोडो यात्रींच्या सत्काराच्या निमित्ताने काँग्रेस नेते एकाच व्यासपीठावर एकत्र जमले होते. यामध्ये अशोक चव्हाणांसह, आ.बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही समावेश होता.त्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत काँग्रेसमध्ये कोणताही वाद नसल्याचेही म्हटले होते. त्यानंतर आता महसूलमंत्री विखे यांनी चव्हाण यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यावर आता काँग्रेसमधून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उस्मानाबाद,औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्याावरुन शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती.त्याला विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. विखे पाटील म्हणाले की संजय राऊत कोण आहेत ? त्यांना इतके महत्व का दिले जात आहे ?. संजय राऊत काय म्हणतात याला उत्तर द्यायला मी बांधील नाही.

Tags

follow us