Download App

Nashik Graduate Constituency: ‘सत्यजितलाच निवडून आणा’, विखे पाटलांनी दिले आदेश

अहमदनगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर (Nashik Padvidhar Election) मतदारसंघात भाजप (BJP) अद्याप कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही. मात्र महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सत्यजित तांबेंना (Satyajit Tambe) अप्रत्यक्षरित्या पाठिंबा असल्याचे विधान केले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सत्यजित तांबेंना भाजपाचा अधिकृत पाठिंबा नाही. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या पातळीवर पाठिंबा दिला आहे. एक प्रकारे सत्यजित तांबेंना विखेंचा पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. विशेष म्हणजे विखेंच्या समर्थकांनी स्टेस्टस ठेवत तांबे यांचा प्रचार सुरु केला आहे.

“आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कार्यकर्त्यांच्या पातळीवर झालेला आहे. सत्यजित तांबे तरुण आहेत. होतकरू आहेत. त्यांना संधी दिली पाहिजे. म्हणूनच आमच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे,” असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले

नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात अटीतटीची लढत सुरु आहे. उद्या या जागेसाठी मतदान होणार आहे.

दरम्यान, सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांना काँग्रेसकडून निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यांनतर सत्यजित यांनी अपक्ष म्हणून या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.

त्यानंतर काँग्रेसकडून दोघांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली. सत्यजित यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन केले होते. त्यानंतर भाजपकडून सत्यजित तांबेंना जाहीररित्या पाठिंबा देण्यात आला नाही. मात्र तांबेंच्या विजयासाठी भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.

Tags

follow us