चर्चेनंतर त्याचं समाधान होणारच; जरांगेंच्या आंदोलनादरम्यान विखे पाटलांना विश्वास

Radhakrishna Vikhe Patil यांनी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची मोठी घोषणा केली आहे. यावर प्रतिक्रिया दिली.

Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil on Manoj Jarange Hunger Strike for Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन छेडणारे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत मोठी घोषणा केली आहे. येत्या 30 मे पासून आपण कडक आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला असून, हे उपोषण रखरखत्या उन्हात कोणत्याही सुविधांशिवाय करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. यावर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले राधाकृष्ण विखे?

मराठा समाजाच्या बांधवांना कुणबी दाखल दिले नाही किंवा दिले जाणार नाही अशा तक्रारी केल्या जात आहेत. मात्र नेमकं काय घडत आहे हे आम्ही जाणून घेणार आहोत. मग आम्ही जरांगेंशी चर्चा करायला जाणार आहोत. उपोषण करण्याचा मनोज जरांगे यांना अधिकार आहे. पण चर्चेनंतर त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर त्याचं समाधान होईल असा मला विश्वास आहे. असं म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगेंच्या आंदोलनाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे प्रकरणानंतर अहिल्यानगरच्या पांगरमलची आठवण ताजी; विषारी दारूने घेतला होता 16 जणांचा जीव

राज्य सरकारला आपण तब्बल दहा महिने वेळ दिला. प्रेमाने बैठक घेतल्या, मोर्चे काढले, आंदोलनं केली, पण मराठा समाजाला अद्याप आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे आता माझ्याकडे आमरण उपोषणाशिवाय पर्याय उरलेला नाही, असं सांगत जरांगेंनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. उपोषणादरम्यान कोणताही मंडप किंवा विशेष सुविधा नसेल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. मी रखरखत्या उन्हात बाज टाकून उपोषण करणार आहे.

उत्तर प्रदेशातील बेतवा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला; 6 मजुरांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

माझ्या जीवाची लाहीलाही झाली तरी चालेल. उष्माघाताने माझा जीव गेला तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा गंभीर इशारा त्यांनी दिला. पश्चिम महाराष्ट्रातील मराठे सधन असल्याने आरक्षण देता येणार नाही, असे सरकार म्हणत असल्याचा दावा करत जरांगे म्हणाले, मग तिथले ओबीसी सधन नाहीत का? त्यांनी ओबीसी आरक्षणाला बोगस आणि खोटं आरक्षण असेही संबोधले.

Exit mobile version