Radhakrishna Vikhe Patil On Uddhav Thackeray: कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अयोध्येतील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा (Shri Ram Mandir) सोहळा हा नवं वर्षात पार पडणार आहे. (Ayodhya) यासाठी देशभरातून नेतेमंडळी उपस्थिती लावणार आहे. यातच उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात न आल्याने राजकीय वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान यावर मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विधान केले आहे. अयोध्यातील कार्यक्रम हा सोहळा राजकीय नसून कोट्यवधी देशवासीयांच्या मनातील आहे. आपण निमंत्रणाची वाट पाहत बसलात मात्र आपण सोहळ्यात सहभागी न झाल्याने काही फरक पडणार नाही, अशा शब्दांत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे.
शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना विखे यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. यातच अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले नाही याबाबत विखेंना विचारण्यात आले. यावर बोलताना विखे म्हणाले, श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणाची वाट का पाहत आहात? तुम्ही आधीच शरयू नदीत राजीनामा देऊन गेलात. तुम्हाला आता राम मंदिरावर बोलण्याचा अधिकार नाही. तसेच अयोध्यातील कार्यक्रम हा काही राजकीय सोहळा नाही आहे. हा संपूर्ण भारतीयांच्या मनातील श्रद्धेचा विषय आहे. आपण निमंत्रणाची वाट पाहत बसलात मात्र आपण सोहळ्यात सहभागी न झाल्याने काही फरक पडणार नाही अशा शब्दात विखे यांनी उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावले.
Sanjay Raut : भाजप रणछोडदास! त्यांचा जन्मच 2014 नंतरचा, इतिहास काय माहित? राऊतांचा हल्लाबोल
आरक्षण न देणाऱ्यांच्या घरावर मोर्चे काढा: इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला महायुतीचे सरकार आरक्षण देईल, किंबहुना याबाबतची खस्त्री देखील आता मराठा समाजाला झाली आहे. त्यामुळं जरांगे पाटील यांनी आंदोलनाची भाषा करणं योग्य नाही. तसेच जरांगे पाटलांना मुंबईला येण्याची आवश्यकता भासणार नाही. उलट ज्यांच्यामुळे आरक्षण गेले, त्यांच्या घरावर मोर्चे नेण्याचा सल्ला मंत्री विखे पाटील यांनी जरांगे यांना दिला.
लोकसभेच्या एवढ्या जागा जिंकणार: नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीमध्ये तीन जगावर भाजपचे कमळ फुलले आहे. आता उद्या जरी राज्यात निवडणुका जाहीर झाल्या तरी जनता पुन्हा मोदी सरकारवरच विश्वास ठेवेल. राज्यात महायुतीचेच सरकार येणार. राज्यातील 48 जागांपैकी 42 जागा महायुतीच्या लोकसभेवर निवडून येतील, असा विश्वास विखे यांनी यावेळी व्यक्त केला.