Download App

Ashadhi Wari : आषाढी एकादशीच्या दिवशी VIP दर्शन बंद; पालकमंत्री विखेंचा मोठा निर्णय

Ashadhi Wari : आषाढी वारी (Ashadhi Wari) म्हटलं की हातात टाळ धरून हरिनामाच्या जयघोषात तल्लीन झालेले वारकरी डोळ्यांसमोर येतात. दरवर्षी राज्यातील लाखो वारकरी पंढरपूरला (Pandharpur) विठ्ठल-रखुमाई मंदिरात विठ्ठल आणि रखुमाईच्या दर्शनासाठी येतात. या भाविकांना दर्शनासाठी कोणतीही अडचण येणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्यावी, वारकऱ्यांना दर्शनसाठी ताटकळतं उभं राहावं लागून नये, यासाठी व्हीआयपी दर्शन (VIP Darshan) बंद करण्यात यावं, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी प्रशासनाला दिल्या. (Radhakrishna Vikhe Patil said VIP darshan will be closed on Ashadhi Ekadashi)

आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात मोठ्या संख्येने आमदार, खासदार, अधिकारी, ठेकेदार हे व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली मंदिरात गर्दी करत असतात. याच पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकत्याच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. ते म्हणाल की, आषाढीच्या दिवशी लाखो भाविक पंढरपुरात येतात. या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज आहे. वारकऱ्यांना दर्शनासाठी कोणतीही अडचण येणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्यावी, त्यासाठी व्हीआयपी पास कुणालाही देऊ नये, फक्त मानाच्या पालख्यांना ह्या पास द्याव्या, असे निर्देश मंत्री विखेनी दिले.

NCP on Nilesh Rane : ‘किंमत नसलेले नाणे….’, ‘…स्वाभिमान ठेवला भाजपच्या दारी’; राष्ट्रवादीकडून राणेंना डिवचणाऱ्या घोषणा…

यंदा आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात व्हीआयपी दर्शन सेवा बंद राहणार आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुंळं यंदा आषाढी वारीत भाविकांना सहज आणि सुलभ दर्शनाचा लाभ होणार आहे. व्हीआयपी दर्शन बंद करण्याच्या या निर्णयाचे सध्या सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

विखे यांनी सांगितले की, विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविण्यात येणार आहेत. भाविकांना उन्हामुळे कोणतीही अडचण होऊ नये म्हणून मंदिर परिसरात रस्त्यांवर पत्रा शेड तयार करण्यात येत आहेत. दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना पाणी आणि अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात येणार असल्यातं ते म्हणाले.

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जावे मारण्याची धमकी देण्यात आली. राऊत यांनी सांगितले की, मला अनेकदा धमक्या आल्या. त्याबाबत मी सरकारकडे तक्रारी केल्या. पण माझी दखल घेतली जात नाही. याबाबत पत्रकारांनी विखेंना विचारले असता, राऊत यांनी केलेल्या आरोपांची विखे-पाटील यांनी खिल्ली उडवत संजय राऊत हे स्वतःलाच धमकी देत असतात, असं म्हणाले.

राज्यात खडीसाठी देखील धोरण ठरवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यामध्ये महसूल विभागाने वाळूचे धोरण ठरवले, त्याचप्रमाणे आता खडीसाठी सुद्धा लवकरच एक नवे धोरण ठरवले जाईल. वाळूचा काळाबाजार थांबवण्यासाठी सॅंड क्रश वापरण्याची गरज असल्याचे मतही यावेळी मंत्री विखे यांनी व्यक्त केले.

या आढावा बैठकीनंतर पालकमंत्री विखेंनी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. समाधान आवताडे, प्रशांत परिचारक, विभागीय आयुक्त यांच्यासह पंढरपूर मधील आषाढी वारीचा आढावा घेत विविध ठिकाणची पाहणी केली.

Tags

follow us