Kalpana Kharat : भोंदू अशोक खरात याची पत्नीचे कल्पना खरात हिचा बँक व्यवहारात संबंध असल्यामुळे त्यांना ताब्यात घेणे आवश्यक असल्याचे सरकारी वकील व तपास अधिकारी यांनी न्यायालयाच्या निर्धनास आणून दिले त्यामुळे कल्पना खरात हिचा अटकपूर्व जामीनअर्ज न्यायालयाने भेटायला. त्यामुळे कल्पना खरात यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. खरात ह्या 31 मार्च पासून फरार आहेत
आरोपी अशोक खरात (Ashok Kharat) यांच्या पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) यांनी राहाता सत्र न्यायालयात (Rahata Court) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर दोनदा सुनावणी पुढे ढकलल्यानंतर आज तिसऱ्यांदा सुनावणी झाली त्यात त्यांचा पूर्व जामीन अर्ज भेटायला. यावेळी फिर्यादीचे वकील शुभम गोंदकर, सरकारी वकील सतीश पानगव्हाणे तसेच बचाव पक्षाचे वकील प्रशांत गिरी यांनी आपापले युक्तिवाद मांडले.शिर्डीतील जमीन खरेदी व फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांचे नाव पुढे आले होते.
बचाव पक्षाचे वकील गिरी यांनी सांगितले की, रावसाहेब गोंदकर यांच्या जमीन खरेदीसंदर्भातील कोणत्याही बैठकीत कल्पना खरात उपस्थित नव्हत्या. त्यामुळे अशोक खरात यांच्या कथित कृत्यांसाठी त्यांची पत्नी जबाबदार धरता येणार नाही. तसेच कल्पना खरात यांच्या बँक खात्यांचा वापर पतीकडून होत असल्याने आर्थिक व्यवहार त्यांना माहीत होतेच असे म्हणता येणार नाही. असे त्यांनी स्पष्ट केले. कुटुंबाची जबाबदारी, मुलांचे संगोपन आणि पोलिसांना आवश्यक कागदपत्रे आधीच उपलब्ध असल्यामुळे कोठडीची गरज नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच तपासात सहकार्य करण्याची आणि रोज हजेरी लावण्याची तयारी दर्शवली.
सरकारी पक्षाने मात्र या दाव्यांना विरोध करताना सांगितले की, पॉवर ऑफ अटर्नी करताना कल्पना खरात स्वतः उपस्थित होत्या. संबंधित कागदपत्रांवर त्यांच्या स्वाक्षऱ्या, अंगठ्याचे ठसे आणि छायाचित्रे आहेत. याशिवाय व्याज व्यवहारात दोन टक्के रक्कम त्यांना देण्याचा उल्लेख असल्याने त्यांना व्यवहाराची माहिती नव्हती हा दावा ग्राह्य धरता येत नाही असे मांडले. तसेच सावकारकी परवान्याबाबत प्रश्न उपस्थित करत मयत जितेंद्र शेळके यांच्या साक्षीचाही संदर्भ देण्यात आला.
होणार आगळ्या वेगळ्या गावाचं दर्शन; तुंबाडची मंजुळामधील पहिलं गाणं प्रदर्शित
फिर्यादीचे वकील शुभम गोंदकर यांनी नोंदणीकृत मुखत्यारपत्र आणि विविध माध्यमांतून झालेल्या आर्थिक व्यवहारांचा दाखला देत कल्पना खरात यांचा सहभाग असल्याचे सांगितले. पत्नीच्या खात्याचा पतीकडून वापर होणेही गैर असल्याचे त्यांनी नमूद केले. तपास अधिकारी निवांत जाधव यांनी न्यायालयात सांगितले की, कल्पना खरात कोणतीही नोकरी करत नसतानाही त्यांच्या खात्यातून सुमारे सात कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. या रकमेचा स्रोत तपासणे आवश्यक आहे. तपासात 57 मालमत्ता समोर आल्या असून त्यापैकी सुमारे 40 टक्के मालमत्ता कल्पना खरात यांच्या नावावर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांना व्यवहाराची माहिती नसल्याचा दावा ग्राह्य धरता येणार नाही असे त्यांनी न्यायालयासमोर मांडले.
