Download App

Rahul Gandhi यांचा नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप : भारतात लोकशाही संकटात!

मुंबई : भारताचा मूळ विचार नष्ट करून संपूर्ण भारतावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आपला एक विचार थोपवू पाहत आहे. पेगासस प्रकरणामध्ये माझाही फोन रडारवर होता. मला अनेक अधिकाऱ्यांनी फोन बोलताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता. हे एकप्रकारे दबावाचं वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामुळे भारतात लोकशाही संकटात आहे, असा आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केला.

केंब्रिज विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीर, पुलवामा हल्ला, चीन, अमेरिकाबाबतही आपले मत व्यक्त केले. राहुल गांधी म्हणाले की, भारताचे विद्यमान पंतप्रधान हे भारताचे मूळ विचार नष्ट करत आहेत. आपला एकच विचार ते थोपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे भारतात लोकशाही संकटात आहे. पेगासस प्रकरणात माझाही फोन रडारवर असल्याची माहिती मला अधिकाऱ्यांनाकडून मिळाली होती. तसेच तुमचा फोन टॅप होतो आहे. फोनवर बोलत असताना सावधगिरी बाळगण्याचा काही अधिकाऱ्यांनी मला सल्ला दिला होता. भारतात एक प्रकारे दबावाचं वातावरण तयार केले जात आहे. देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केसेस टाकण्याचे प्रकार सुरु आहेत. माझ्या विरोधातही काही केसेस आहेत.

Bachhu Kadu असे का म्हणाले? भटके कुत्रे उचला अन् आसामला नेऊन टाका!

जम्मू काश्मीर ही तथाकथित हिंसक जागा आहे. पुलवामा हल्ल्यात जिथे ४० जवान शहीद झाले होते. तिथे मी गेलो आहे, असे सांगत राहुल गांधी म्हणाले की, चीन हा देश शांततेचा पुरस्कर्ता आहे. चीनची रणनिती काय आहे. तसेच त्याद्वारे चीनने कसा विकास केला हेदेखील आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी सांगितले आहे.

Tags

follow us