Bachhu Kadu असे का म्हणाले? भटके कुत्रे उचला अन् आसामला नेऊन टाका!

Bachhu Kadu असे का म्हणाले? भटके कुत्रे उचला अन् आसामला नेऊन टाका!

मुंबई : भटकी कुत्रे असोत की, पाळीव कुत्री असोत, त्यावर एकदम सोपा इलाज आहे. कुत्रे पाळीव असेल तर ते आपल्या घरी असायाला पाहिजे. ज्यांची पाळीव कुत्रे रस्त्यावर येत असेल तर त्यांच्या मालकांवरच थेट कारवाई केली पाहिजे. मला वाटतं की यावर एखादी समिती स्थापन करण्यापेक्षा मंत्री महोदय यावर थेट अ‌ॅक्शन प्लॅन जाहीर करा. त्यासाठी भटकी कुत्री उचला आणि थेट आसामला नेऊन टाका. तिथे आम्ही गेलो असता कळाले की कुत्र्यांना मोठी किमत मिळत असून एक कुत्रा तिथे आठ हजारांना विकला जात आहे. आपल्याकडे बोकड तर तिकडे कुत्रे खातात म्हणे, असे सांगत राज्य सरकारला मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार (MLA) बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी अफलातून कल्पना सुचवली आहे.

राज्य विधी मंडळाच्या अर्थ संकल्पिय अधिवेशनात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित झाला. या भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre), भाजपचे अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar), शिवसेनेचे प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आधीनी केली. याप्रसंगी राज्य सरकारला बच्चू कडू यांनीही अफलातून कल्पना सुचवली आहे.

Mahrashtra State Board Exam : बारावीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेणार नाही!

”जेवढी कुत्री रस्त्यावर आहेत तेवढी आसाममध्ये नेऊन टाका, कारण आसाममध्ये आठ ते नऊ हजारांना एका कुत्र्याला किंमत मिळत आहे. तुम्ही थोडी माहिती घ्या. मी नुकताच गुवाहाटीला गेल्याने मला ही माहिती कळाली. तुम्हीही माहिती घ्यावी, असा सल्ला दिला आहे.

”भटके कुत्रे ते उचला अन् आसामला नेऊन टाका, आम्ही गुवाहटीला गेलो तेव्हा कळाले तिथे कुत्र्यांना मोठी किंमत आहे. एक कुत्रा आठ हजारांना विकला जातो. आपल्याकडे बोकडे तर तिकडे कुत्रे खातात” असे म्हणत भटक्या कुत्र्यांबाबत बच्चू कडू यांनी विधीमंडळ अर्थ संकल्पिय अधिवेशनात भटक्या कुत्र्यांवर लक्षवेधीत अफलातून सल्ला दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube