Download App

Rahul Gandhi : मोठी बातमी! राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा रद्द

Rahul Gandhi : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. विमानात बिघाड झाल्याने दौरा रद्द

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा आजचा कोल्हापूर (Kolhapur) दौरा रद्द झाला आहे. विमानात बिघाड झाल्याने दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ते उद्या सकाळी 8.30 वाजता कोल्हापुरात येणार आहेत.

राहुल गांधी यांच्याहस्ते आज कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करणार होते मात्र त्यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने राहुल गांधी यांचा आजचा दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. आजचा दौरा रद्द झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा उद्या सकाळी दहा वाजता होणार आहे.

माहितीनुसार, राहुल गांधी उद्या सकाळी 8.30 वाजता कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहे आणि सकाळी दहा वाजता पुतळ्याचं लोकार्पण पार पडणार आहे. काँग्रेसचे परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण आणि संविधान सन्मान संमेलनाचे आयोजन केले आहे. उद्या होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनात राहुल गांधी कोणता मुद्दा मांडणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी संविधान बचावचा नारा देत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी होत असलेल्या संविधान सन्मान संमेलनात राहुल गांधी कोणता मुद्दा उपस्थित करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसिकडे राज्यात 10 ऑक्टोबरनंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षांकडून विधानसभेची जोरदार तयारी होताना दिसत आहे.

मोठी बातमी! परराष्ट्र मंत्री जयशंकर जाणार पाकिस्तानला, SCO शिखर परिषदेत करणार भारताचे प्रतिनिधित्व

follow us