‘छात्रों की बडी जीत… MPSC आंदोलनासाठी राहुल गांधींकडून विद्यार्थ्यांचं कौतुक पण रोहित पवारांना श्रेय देणं टाळलं

Rahul Gandhi MPSC protest Rohit Pawar एमपीएससी आंदोलनावरून राहुल गांधींनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. मात्र रोहित पवारांना श्रेय देणं टाळलं.

Rahul Gandhi MPSC Protest Rohit Pawar

Rahul Gandhi MPSC Protest Rohit Pawar

Rahul Gandhi praises students for the MPSC protest but avoids giving credit to Rohit Pawar : एमपीएससी कथित पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यात गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर सरकारने निर्णय घेतल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. मात्र यावेळी त्यांनी रोहित पवारांना या आंदोलनाच्या यशाचं श्रेय देणं टाळलं. अशी चर्चा सुरू आहे.

नेमकं का म्हणाले राहुल गांधी?

MPSC च्या अध्यक्षांना अखेर जावंच लागलं. आता भ्रष्टाराची पुर्ण चौकशी होईल. या आंदोलनाचं यश हे विद्यार्थ्यांचं, तरूणांचं आणि सत्याग्रहाचं मोठं यश आहे. असं म्हणत राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. तसेच आता भ्रष्टाराची पुर्ण चौकशी होईल. असा विश्वासही व्यक्त केला. मात्र यामध्ये चर्चा झाली ती राहुल गांधींना विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. मात्र यावेळी त्यांनी रोहित पवारांना या आंदोलनाच्या यशाचं श्रेय देणं टाळलं.

Video : मोदींचे 200 अधिकारी आम्हाला आतली माहिती देत आहेत…राहुल गांधींचा मोठा दावा

दुसरीकडे गेल्या 12 दिवसांपासून रोहित पवारांनी सुरूवातीपासून या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. एवढचं नाही. तर ते आंदोलनासाठी विद्यार्थ्यांच्या मागे ठाम उभे राहिले. सरकारवर जोरदार हल्ला करत कायम आंदोलनाच्या मुख्य चेहरा आणि ओळख म्हणून रोहित पवार गेल्या 12 दिवसांपासून चर्चेत होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून देखील या रोहित पवारांना टार्गेट करण्यात आलं. ज्यामध्ये हे आंदोलन केवळ विरोध करायचा म्हणून आहे. स्वत: चं राजकीय अस्तित्त्व निर्माण करायचं किंवा लॉन्चिंग करायचं म्हणून रोहित पवार हे आंदोलन करत असल्याचा आरोप सत्ताधारी आणि समर्थकांकडून करण्यात आले.

म्हणूनच कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली…, अजित आगरकरांवर सर्वात मोठा आरोप

या आंदोलनाच्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या रोहित पवारांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. रोहित पवारांनी हे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी नाही तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना इम्प्रेस करायला करत आहेत. असाही आरोप करण्यात आला. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत.

गरब्यात सुंदर दिसण्याची Beauty IV Drip ची क्रेझ; हजारो रूपये खर्चून खरंच चेहरा उजळतो?

दुसरीकडे मात्र राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी आंदोलनाचे श्रेय देणं टाळलं आहे. त्यात आंदोलनामध्ये विश्नजीत कदम यांच्यामुळे नेतृत्वही शेअर झाले. तेथेही रोहित पवारांचे महत्त्व कमी केले गेले. कारण या आंदोलनाच्या यशाने रोहित पवारांना एक वेगळं वलय निर्माण झालं आहे. तसेच सरकारला ते झुकवू शकतात. अशी त्यांची एक प्रतिमा तयार झाली आहे. त्यामुळे त्यांना महत्त्व न देण्याचं काँग्रेसने ठरवलं आहे.

Exit mobile version