Rahul Narvekar On Maharashtra Political Crises : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिक्कामोर्तब केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government) मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. या निर्णयावरुन राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
यावर आता राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरूवारी राज्याच्या सत्तासंघर्षावर न्यायालायाने दिलेल्या निर्णयावर पुन्हा एकदा आपली प्रतिक्रिया दिली. तर यावेळी त्यांनी आमदारांना अपात्र ठरवण्यावर देखील आपलं मत व्यक्त केलं. त्याचबरोबर त्यांनी आमदार अपात्र कसे होतात? त्याची संपूर्ण प्रक्रिया कशी असते? हे सांगितले आहे.
नार्वेकरांनी ही प्रक्रिया सांगताना म्हटले की, घटनेच्या 10 सुचीमध्ये जेव्हा सदस्य अपात्र ठरतो तेव्हा अशी परिस्थिती सांगण्यात आली ज्यामुळे सदस्य अपात्र ठरतो. त्यासाठी कारण सांगण्यात आले आहेत. जर एखद्या सदस्याने आपल्याला दिलेल्या व्हिपचं उल्लंघन केलं. सांगितल्याप्रमाणे मतदान नाही केलं किंवा मतदानासाठी गैरहजर राहिला तर तो सदस्य अपात्र ठरतो.
Udhav Thackeray : ठाकरे अध्यक्षांना पत्र लिहिणार, चुकीचा निर्णय दिला तर कोर्टात जाणार
त्याचबरोबर त्याने पक्षविरोधी कारवाई केली किंवा आपल्या पक्षाचा पाठिंबा काढून घेतला. असं जर झालं तर त्या संबंधित सदस्याचं सदस्यत्व रद्द होत. त्यामुळे ठाकरे गटाने केलेल्या आमदारांच्या अपात्रतेसाठीच्या याचिकेमध्ये नेमके काय आरोप? केले आहेत हे पाहावं लागेल. व्हिप लागू केला असेल तर तो लागू होतो का? कारण तो सभागृहातील गोष्टींसाठी असतो.
त्यामुळे या सर्व कायदेशीर बाबी लक्षात घेऊन आमदारंच्या अपात्रतेवर निर्णय घ्यावा लागेल. त्यावर आता बोलणे योग्य ठरणार नसल्याचं मत राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केलं आहे.