Rahuri by-election! Will Akshay Kardile fight unopposed or will Tanpure : अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती येथे तर शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणुका या पार पडणार आहे दोन्ही निवडणुका या बिनविरोध व्हाव्यात अशी प्रतिक्रिया माजी खासदार सुजय विखे यांनी दिली तसेच अक्षय लाच उमेदवारी देण्यात यावी अशी जनभावना असल्याने याबाबत आपण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असून राहुरी ची निवडणूक ही बिनविरोध व्हावी अशी आपली इच्छा आहे असं विखे म्हणाले मात्र दुसरीकडे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे पोट निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा सक्रिय झाले असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार की प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या रिंगणात उतरून कर्डिले यांना मात देणार हे पाहणं आता उत्सुकताचे ठरणार आहे.
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! लेकीला छेडणाऱ्या हुल्लडबाजाला पालकांनी कॅम्पसमध्येच लोळवले
2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप कडून शिवाजीराव कर्डिले तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून प्राजक्तांपुरे यांनी विधानसभा निवडणूक लढवली तर यामध्ये शिवाजीराव कर्डिले यांनी तनपुरे यांना पराभूत करत आमदारकीला गवसणी घातली मात्र अवघ्या वर्षभरानंतरच अल्पशा आजाराने घडले यांचे निधन झाले व राहुरी मध्ये पोटनिवडणूक ही जाहीर झाली वडिलांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांनाच उमेदवारी देऊन आमदार केलं जावं अशी जनभावना व्यक्त केली जाऊ लागली.
IND VS ENG Semifinal : इंग्लंडचे 5 खेळाडू टीम इंडियासाठी ठरू शकतात धोकादायक
अक्षय कर्डिले यांचा राजकारणातील फारसा नसलेला अनुभव यामुळे ही सीट माजी खासदार सुजय विखे लढवणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या मात्र यावरती खुद्द आता सुजय यांनी बोलताना स्पष्ट सांगितले की शिवाजीराव यांच्या निधनानंतर अक्षय ला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी कार्यकर्ते करत असून जन भावना आहे याबाबत आपण पालकमंत्री राधाकृष्ण विखे सह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा केली आहे उमेदवारी बाबत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे उमेदवार जो कोणी असेल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आमच्या खांद्यावर असेल असे म्हणतच मी उमेदवार नाही असे स्पष्ट मत यावेळी सुजय विखे यांनी व्यक्त केले
बिनविरोध कि तनपुरे फाईट देणार
राहुरी पोटनिवडणूक येणाऱ्या काही दिवसात जाहीर होणार असून दहा ते बारा मार्च पर्यंत आचारसंहिता लागू होईल असे सुतवाच सुजय विखे यांनी केले दरम्यान निवडणुकीच्या अनुषंगाने प्राजक्त तनपुरे हे देखील झालेल्या परवाचा बदला घेण्यास सज्ज झाले असून गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघांमध्ये विविध कारणे ते चर्चेत आहेत नागरी समस्या घेऊन आंदोलने असतील किंवा नगर मनमाड रस्त्यावरून प्रशासनाला धारेवर धरले या मुद्द्यावरून तनपुरे चांगलेच आक्रमक होत नागरी प्रश्न हाताळत आहेत तर दुसरीकडे अक्षय कर्डिले देखील वडिलांचा वारसा चालवत जनता दरबार भरवत जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तनपुरे यांची सक्रियता पाहता निवडणूक लढविण्याच्या दिशेने ते पाऊल टाकता येत असे बोलले जात आहे.
तनपुरे फाईट देऊ शकतात
2024 च्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभवाचा बदला घेण्यासाठी प्राजक्त तनपुरे हे सज्ज झाले असून त्या अनुषंगाने निवडणुकीची तयारी देखील त्यांच्याकडून सुरू आहे कारखाना निवडणुका असेल किंवा त्या पाठोपाठ झालेल्या नगरपालिका नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील तनपुरे यांनी आपला जलवा दाखवत राहुरी नगरपरिषदेवरती सत्ता मिळवली या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले यातच अक्षय चा असलेला अत्यल्प राजकीय अनुभव पाहता तनपुरेंसाठी ही निवडणूक सोपी आहे मात्र अक्षय सोबत असलेली सहानुभूतीची लाट यामुळे या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त होऊ शकते तसेच बिनविरोध निवडणूक झाली तर तनपुरेंच्या पदरी काय पडणार हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.
महाविकास आघाडीची भूमिकेकडे लक्ष
शिवाजीराव यांच्या निधनानंतर अक्षय कर्डिले यांच्याकडे भावनात्मक लाट असल्याने त्यांना याचा फायदा होऊ शकतो तसेच सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचे पाठबळ यामुळे देखील अक्षय यांची बाजू भक्कम दिसते आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीपाटोपाठ नगर परिषदा नगरपालिका व महानगरपालिकांमध्ये झालेली पराभवाची मालिका पाहता तनपुरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर महाविकास आघाडी म्हणून किती प्रभाव पडेल हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार लंकेचे असलेली क्रेझ मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांना फारसं जादू दाखवता आली नाही यामुळे या निवडणुकीची धुरा देखील लंकेच्या खांद्यावर असणार आहे त्यामुळे या निवडणुकीत आघाडीला यश मिळणार का हे पाहणं देखील महत्त्वाचा आहे.
