सरसकट कर्जमाफी करा अन्यथा फडणवीसच्या… राहुरीत शेतकरी संतापले,शेतकरी सेनेचा रस्ता रोको

Farmers angry in Rahuri सरकारच्या कर्जमाफीविरूद्ध आणि सरसकट कर्जमाफीसाठी राहुरी येथे शेतकऱ्यांचे वतीने रास्ता रोको करण्यात आला.

Farmers Angry In Rahuri

Farmers angry in Rahuri, block the road of Shetkari Sena for complete loan waiver : शेतीमालाला भाव मिळत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करावी तसेच जाचक अटी व नियम रद्द कराव्यात अन्यथा येत्या 15 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानासमोर शेतकऱ्यांसमवेत आंदोलन करण्यात येणार असा इशारा शेतकरी सेनेच्या वतीने देण्यात आला सरसकट कर्जमाफीसाठी राहुरी येथे शेतकऱ्यांचे वतीने रास्ता रोको करण्यात आला.

Indian Cricket Team Schedule : भारतीय संघ कसोटी मालिका कधी खेळणार? अफगाणिस्ताननंतर ‘या’ संघाशी भिडणार टीम इंडिया 

यावेळी बोलताना शिंदे सेनेचे रवींद्र मोरे म्हणाले 2024 च्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाईल असा आश्वासन त्यांनी दिलं होतं मात्र कर्जमाफीला जे निकष व नियम लावलेले आहे यामुळे यांनी कशा अधीन राहून शेतकऱ्यांचा सातबारा काही कोरा होत नाही असं मोरे म्हणाले.तसंच पुढे बोलताना मोरे म्हणाले निर्यात बंदीचे जे चुकीचे धोरण शेतकऱ्यांवर लावले गेलेले आहे यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. साखर कापूस तसेच कांदा निर्यात बंदी करण्यात आली आहे यामुळे शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत सापडत चालला आहे.

घरफोडी करणारे दोघे संशयित जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेकडून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

उद्योग पतींचे यांचे कर्ज हे सहज माफ केले जातात उद्योगधंद्याला चालना मिळावी यासाठी असं केलं जातं असं शासनाकडून सरकारकडून सांगितलं जातं तसेच शेती देखील एक मोठा उद्योग आहे हा देश कृषीप्रधान आहे यामुळे शेतकरी जगला पाहिजे यासाठी सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांवर अन्याय झाला नाही पाहिजे अशी आमची मागणी आहे असं शिवसेना शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवी मोरे म्हणाले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हवे

आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असते तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी केली असती कारण ते मूळ शेतकरी आहेत यामुळे त्यांनी अशा जाचक अटी निकष लावले नसते असं मोरे म्हणाले तसेच येत्या 15 तारखेपर्यंत शासनाने कर्जमाफी बाबत काढलेले नियम बदलले नाही तर वर्षा बंगल्यावर आम्ही शेतकऱ्यांना घेऊन जाऊन उपोषण करणार असा इशारा शिंदे सेनेचे रवींद्र मोरे यांनी सरकारला दिला आहे.

BJP Vs NCP : नवनीत राणांनी अट फेटाळली अन् राष्ट्रवादीकडून भाजप नेत्यांच्या ‘पॅकिंगची चर्चा रंगली

आंदोलनाचे प्रमुख शिवसेना शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवी भाऊ मोरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे किरण कडू पाटील, राजेंद्र लोंढे, शेतकरी संघटनेचे प्रकाशभाऊ देठे, बाळासाहेब जाधव, सचिन कर्पे, सुभाष जुंदरे,राहुल कर्पे, रामभाऊ जगताप, वसंत कदम, तोडमल पप्पू, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्य संतोष चोळके, सुनील इंगळे, आनंद वने, सचिन म्हसे, किशोर वराळे, प्रमोद पवार, प्रसाद धुमाळ, सुभाष वने आदी राहुरी तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा दिला.

follow us