संभाजीनगरात ‘डॉन’ बाबा फर्जनच्या मृत्यूनंतर घरावर छापा; पिस्टल, रायफल, काडतुसं अन् सोन्या-चांदीसह मोठं घबाड हाती

don Baba Farjan Sambhajinagar मध्ये 90च्या दशकात दहशत निर्माण करणाऱ्य 'डॉन' बाबा फर्जनच्या मृत्यूनंतर त्याच्या बंगल्यावर कारवाई केली आहे.

Don Baba Farjan Sambhajinagar

Don Baba Farjan Sambhajinagar

Raid on house of ‘don’ Baba Farjan after his death in Sambhajinagar massive haul including pistol, rifle, ammunition, gold silver seized : छत्रपती संभाजीनगर शहरातील गुन्हेगारी विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे शहरात 90च्या दशकात दहशत निर्माण करणाऱ्या तथाकथित ‘डॉन’ बाबा फर्जनच्या मृत्यूनंतर अवघ्या महिनाभरातच शहर गुन्हे शाखेने त्याच्या मिटमिटा परिसरातील बंगल्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांना पिस्टल, रायफल, काडतुसं अन् कोट्यवधींची रोख रक्कम सोन्या-चांदीसह मोठं घबाड हाती लागलं आहे. या छाप्यामुळे १९८० ते १९९० च्या दशकात शहराच्या गुन्हेगारी आणि राजकीय वर्तुळात प्रभाव टाकणारे बाबा फर्जन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

‘PAW Patrol: The Dino Movie’ आता 21 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणार

छत्रपती संभाजीनगर शहर गुन्हे शाखेने महिनाभरापूर्वी मृत्यू झालेल्या डॉन’ बाबा फर्जनच्या मिटमिटा परिसरातील बंगल्यावर मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली. या कारवाईत, ५ कोटी २६ लाख २९ हजाराची रोकड.२ पिस्टल,६ रायफल, ६ हजार ३५० काडतुसे,मोठ्या प्रमाणात तलवारी,चाकू,सुरे अशी शस्त्र ही जप्त करण्यात आलीय. तसेच कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने तसेच काही शस्त्रे जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिकृत तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

कोण होता बाब फर्जन?

१९८० ते १९९० च्या दशकात सिटी चौक परिसरातील बुढीलेन भागातून बाबा फर्जनने शहरात आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. किल्ले अर्क परिसरातील बर्फ कारखाना, जमिनीचे व्यवहार, औद्योगिक वसाहतीतील कामगार संघटना आणि विविध आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून त्याने शहरात आपला प्रभाव वाढवला होता. त्या काळात अनेक व्यापारी, उद्योजक, राजकीय नेते आणि कामगार नेते त्याच्या दरबारात जात असल्याच्या चर्चा शहरात होत असत. बाबा फर्जनने अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूकही लढवली होती. “हरीण” हे त्याचे निवडणूक चिन्ह होते. तसेच विविध सामाजिक, धार्मिक आणि हिंदुत्ववादी संघटनांशी त्यांचा संबंध होता त्याच्या चर्चा त्या काळात रंगत असत.

कुणकुण लागताच ‘बंटी’ आऊट, ‘नीरज’ इन… शेवटच्या क्षणी भाजपनं नेहमीप्रमाणे पत्ता बदलाला…

पांढरा पोशाख, काळी दाढी, अंगरक्षकांचा ताफा आणि चित्रपटातील नायका सारख्या आलिशान गाड्यांमधून फिरणारी त्यांची प्रतिमा शहरात मोठ्या चर्चेचा विषय होती. अनेक सामान्य नागरिक आपल्या तक्रारी घेऊन त्याच्या दरबारात जात असल्याचेही त्या काळातील लोक सांगतात. १९९५ नंतर त्यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर असा प्रवास सुरू ठेवला. वाढत्या वयानुसार त्यांनी सार्वजनिक जीवनापासून काहीसे अंतर राखले होते. महिनाभरापूर्वी आजारपणामुळे त्याचे निधन झाले. आता त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोलिस कारवाईमुळे त्याच्या जुन्या व्यवहारांबाबत आणि काही गाजलेल्या काही प्रकरणांबाबत नव्याने माहिती समोर येण्याची शक्यता असल्याने बाबा फर्जन या डॉनच्या मृत्यूनंतर त्याच्या गुन्हेगारीचा इतिहास पुन्हा समोर येत आहे.

Exit mobile version