Railway double track work for Ahilyanagar to Pune travel in Half an hour : अहिल्यानगरकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. नगर – पुणे प्रवासासाठी तीन ते चार तासांचा अवधी लागत होता. रस्तेमार्गे होणार वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आता रेल्वे प्रशासनाने एक महत्वाचे पाऊले उचलले आहे. यासाठी रेल्वेच्या दुहेरी मार्गाचे काम लवकरच सुरु होणार असून समांतर दुहेरी रेल्वे मार्ग तयार केल्याने वेळेची बचत होणार आहे. सध्या रस्ते मार्गे नगरहून पुण्याला येण्यासाठी जो तीन ते चार तासांचा प्रवास करावा लागतो आहे. या नवीन रेल्वे मार्गाने नगर – पुणे प्रवास हा तब्बल दीडतासांपर्यंत कमी होऊ शकतो. यामुळे नगरहून पुण्याला जाणाऱ्यांसाठी हि आनंदाची बाब ठरू शकते.
कसा असणार आहे हा प्रकल्प? जाणून घ्या
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. अधिक माहितीनुसार कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने या समांतर रेल्वे मार्गाच्या भूमी सर्वेक्षणाचा अंतिम प्रकल्प अहवाल सादर केला आहे. तब्बल 98 किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गावर 12 रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार असल्याचा प्रस्ताव आहे. तसेच या मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी सुमारे चार वर्षांचा कालावधी लागू शकतो अशी माहिती दिली जातेय. प्रस्तावित रेल्वे मार्गावर ताशी 160 किलोमीटर वेगाने रेल्वे धावेल. यामुळे नगर – पुणे प्रवाश्यांच्या वेळेची बचत हि होईल.
कोथरूड पोलिसांवर तरुणींचा गंभीर आरोप; रूपाली चाकणकरांचा तातडीचा फोन, राज्य महिला आयोगाची तत्काळ दखल
रेल्वे मार्गासाठी या तालुक्यातील जमिनी होणार संपादित
पुणे- अहिल्यानगर दुहेरी रेल्वेमार्गासाठी एकूण 785.898 हेक्टर जमिनीचे संपादन हे केले जाणार आहे. साधारणपणे यामध्ये खाजगी मालकीची 727.995 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. तर सरकारी जमीन 13.016 हेक्टर व वनजमीन 44.956 हेक्टर इतकी लागणार आहे. तब्बल 98 किलोमीटरचा या रेल्वे मार्गासाठी हवेली, शिरूर तसेच पारनेर आणि अहिल्यानगर या चार तालुक्यातील जमीन या संपादित करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वाधिक जास्त जमीन ही शिरूर तालुक्यातून जाणार आहे.
फोटो, टाचण्या, काळी बाहुली आणि लिंबं! राजगडमध्ये काळ्या करणीचा अघोरी प्रताप, गावकरी भयभीत
ही आहेत 12 प्रस्तावित रेल्वे स्टेशन
नगर – पुणे रेल्वे मार्गाचे जे प्रस्तावित काम येणाऱ्या काळात सुरु होणार आहे. यामध्ये तब्बल 12 स्टेशन हे प्रस्तावित असणार आहे. यामध्ये आपण पहिले तर लोणी काळभोर, कोलवडी, वाघोली, वढू, जातेगाव, रांजणगाव एमआयडीसी, कोहकडी, सुपे एमआयडीसी, कामरगाव, चास आणि अहिल्यानगर ही रेल्वे स्टेशन आहेत. यापैकी रांजणगाव एमआयडीसी आणि सुपे एमआयडीसी ही मुख्य स्टेशन्स असणार आहे अशी माहिती मिळते आहे.
प्रवाशांच्या वेळेची होणार बचत
आजच्या स्थितीला नगरहून पुणे व पुण्याहून नगरला येणाऱ्या -जाणाऱ्यांची संख्या मोठी वाढली आहे. दरदिवशी बसने जाणाऱ्यांची संख्या पाहता थेट नगर – पुणे रेल्वे सुरु करण्यात यावी अशी मागणी ही वारंवार केली जात होती. नगर – दौंड – पुणे अशी रेल्वे सेवा सुरु आहे मात्र यामध्ये देखील अधिक वेळ जातो. तसेच रस्ते मार्गाने प्रवास करायचा म्हंटले तर तीन ते चार तासांचा अवधी हा खर्च होत. यामुळे यावर उपाय म्हणून आता समांतर रेल्वेमार्गाचे काम प्रस्तावित आहे. यामुळे प्रवाश्यांचा वेळेची बचत होण्यास मदत होईल. तसेच अहिल्यानगर ते पुणे हा प्रवास देखील सुखकर होईल.