फोटो, टाचण्या, काळी बाहुली आणि लिंबं! राजगडमध्ये काळ्या करणीचा अघोरी प्रताप, गावकरी भयभीत

फोटो, टाचण्या, काळी बाहुली आणि लिंबं! राजगडमध्ये काळ्या करणीचा अघोरी प्रताप, गावकरी भयभीत

Aghori Karani Case Exposed In Rajgad : पुणे जिल्ह्यातील (Pune News) राजगड तालुक्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिरपोडी गावातील एका शेतात बाभळीच्या झाडावर (Aghori Karani Case) काळी बाहुली, लिंबं, बिबं आणि टाचण्या वापरून अघोरी प्रकार केल्याचं उघडकीस आलं आहे. विशेष म्हणजे या प्रकारात गावचे माजी सरपंच विठ्ठल कोडीतकर यांच्यासह इतर दोन जणांचे फोटो (Pune Crime) वापरण्यात आले आहेत.

शेतात दिसला संशयास्पद प्रकार

हिरपोडी गावातील एका राईस मिलच्या मागे असलेल्या शेतात, एका शेतकऱ्याने सकाळी शेतात काम करताना झाडाकडे पाहिलं असता हा भयावह प्रकार त्याच्या निदर्शनास आला. त्याने तात्काळ गावकऱ्यांना याची माहिती दिली.

लाखोंचा दंड पण बंगला सुटेना; मंत्रिपद चार महिन्यांपुर्वीच गेले बंगला धनंजय मुंडेंकडेच, भुजबळांची प्रतिक्षा कायम

काळी बाहुली लिंबं-बिबं, हळद-कुंकू

घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांना बाभळीच्या झाडावर एक काळी बाहुली खिळ्यांनी ठोकलेली दिसली. या बाहुलीसोबत माजी सरपंच विठ्ठल कोडीतकर आणि इतर दोन व्यक्तींचे फोटो होते. आजूबाजूला टाचण्या लावलेली लिंबं, बिबं, हळद-कुंकू यांसारख्या गोष्टी दिसून आल्या. हा सर्व प्रकार कोणीतरी जाणीवपूर्वक आणि करणीसारख्या अंधश्रद्धेच्या उद्देशाने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

तुम्ही खरे भारतीय असता तर…; भारतीय सैन्यावरील विधानावरून SC ने राहुल गांधींना झापले

गावकऱ्यांनी साहित्य जाळून टाकलं

हा प्रकार पाहून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी झाडावरील संपूर्ण साहित्य काढून ते गावाबाहेर नेऊन जाळून टाकलं. मात्र, अशा घटनांमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यापूर्वीही परिसरात अशा प्रकारांच्या काही घटना घडल्या असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. त्यामुळे गावात वाढती असुरक्षितता लक्षात घेता, पोलीस प्रशासनाने तात्काळ या प्रकाराची दखल घ्यावी, अशी मागणी शेतकरी आणि नागरिकांनी केली आहे.

पोलीसांकडून चौकशीची शक्यता

या संदर्भात बोलताना माजी सरपंच विठ्ठल कोडीतकर म्हणाले, माझा फोटो वापरून असा प्रकार घडवला गेला याचा आम्हाला अत्यंत दु:ख आणि संताप आहे. हे फक्त माझ्यावर नाही तर संपूर्ण गावाच्या सुरक्षिततेवर घाला आहे. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार असून या प्रकाराचा तपास लावावा, ही आमची मागणी आहे. या प्रकरणी अद्याप पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, मात्र ग्रामस्थ लवकरच यासंदर्भात राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाची चौकशी करतील का, याकडे संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube