Download App

विधानसभेच्या तोंडावर केंद्र सरकारची महाराष्ट्रात ‘रेल्वे लाईन’; जळगाव ते जालना मार्गाला दिली मंजुरी

केंद्र सरकारने मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र जोडणाऱ्या जळगाव ते जालना या १७४ किलोमीटर लांबीच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली.

  • Written By: Last Updated:

Jalgaon to Jalna Railway Line :  आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठेवून केंद्र सरकारने मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र जोडणाऱ्या जळगाव ते जालना या १७४ किलोमीटर लांबीच्या ७ हजार १०६ कोटी रुपयांच्या नव्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. (Railway Line) या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील दळणवळण गतिमान होणार असून पर्यटकांना अजिंठा आणि वेरूळ या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणं आणखी सुलभ होणार आहे.

सावधान! गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट्स लावणं महागणार; सरकार 28 टक्के GST आकारण्याच्या तयारीत

मालवाहतुकीला चालना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जळगाव-जालना प्रकल्पासह आठ मोठ्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि मराठवाड्यातील जालन्याला जोडणाऱ्या या प्रकल्पाला अजिंठा लेण्यांचं नाव देण्यात आलं असून हा प्रकल्प पाच वर्षांमध्ये पूर्ण करण्यात येईल. या प्रकल्पामुळे पर्यटन, उद्योग, खते, सिमेंट आणि अन्य मालवाहतुकीला चालना मिळणार आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय, वक्फ विधेयकाबाबत 31 सदस्यीय JPC जाहीर, ओवीसींसह या  खासदारांचा समावेश

क्रिमीलेअरबाबतही चर्चा

सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व जमातींच्या क्रिमीलेअरबाबत केलेल्या टिपणीवर या मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यघटनेनुसार अनुसूचित जाती व जमातींसाठी क्रिमीलेअरची तरतूद नाही, जी मूळ आरक्षण व्यवस्था आहे ती कायम राहायला हवी, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकार हे राज्यघटनेच्या चौकटीमध्येच काम करेल. खुद्द संविधानातदेखील एससी-एसटींच्या क्रिमीलेअरबाबत कोणताही उल्लेख नाही, त्यामुळे आरक्षणाच्या अनुषंगाने काही बदल होणार नाही, असं मंत्री वैष्णव यांनी सांगितलं.

follow us

संबंधित बातम्या