Rain Alert : राज्यात ऐन थंडीच्या दिवसांत अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस (Rain Alert) बरसत आहे. गारपीट होत आहे. या पावसामुळे फळबागा आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाचे संकट अजूनही मिटलेले नाही. आजही पुढील काही तासांसाठी वादळाचा इशारा (Weather Update) देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. राज्यातील पुणे, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच याव्यतिरिक्त अन्य भागातही आज पावसाची शक्यता आहे. अनेक ठिकाणी आज ढगाळ हवामान राहिल.
नगरकरांनो सावधान! पुढील तीन-चार तासांत पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र्रात पावसाची शक्यता आहे. . पुणे शहरात काल ढगाळ हवामान होते. आजही हवामानात फारसा बदल होणार नाही. मात्र आज हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे शहरात गुरुवानंतर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळ या ठिकाणीही पाऊस होईल असे म्हटले आहे.
दरम्यान, 5 ऑक्टोरनंतर राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. ढगाळ वातावरण काही दिवस कायम होते. पण, पाऊस पडला नाही. ऑक्टोबर महिन्यात सर्वत्रच कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने कोकणातील काही भागांना ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानंतर आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरात तर पावसाला सुरुवातही झाली आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जर अन्य जिल्ह्यात पाऊस झाला तर या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
Rain Alert : सावधान! आज ‘या’ जिल्ह्यांत होणार गारपीट; हवामान विभागाचा अंदाज काय?
अवकाळी पाऊस का होतोय ?
नैऋत्य अरबी समुद्रापासून 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्याच वेळी कमी दाबाच्या हवेचा पट्टा सक्रिय झाला असल्याने पावसाला अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्याचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे.