राज्यात पुढील दोन दिवस पाऊस; अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणेसह 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Rain Alert : राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, पुणे आणि सातारासह 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून या शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी स्पेशल पॅकेज देखील जारी करण्यात आला आहे. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाकडून देण्यात (Maharashtra Rain Alert) आलेल्या माहितीनुसार, सध्या पश्चिम – मध्य अरब समुद्रात सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच बंगालच्या उपसागरात देखील दक्षिण बांगलादेश आणि आसपासच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने राज्यात पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे काढणीला आलेले पीक लवकरात लवकर काढावे आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने दिला आहे. काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकची काढणी लवकरात लवकर करावी आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तसेच काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी.

भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी दिलं आश्वासन; ट्रम्प यांचा मोठा दावा

तूरकळ ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याने पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी असा सल्ला वंसतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाकडून देण्यात आला आहे.

Exit mobile version