Download App

उन्हाच्या तळपत्या झळा अन् पावसाच्या सरी सोबतच; इचलकरंजीच्या काही भागात पावसाची हजेरी

कागल शहरासह तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने आज हजेरी लावली. रात्री पावणे आठच्या सुमारास १५ मिनिटे पडलेल्या पावसामुळे

  • Written By: Last Updated:

Rain in Ichalkaranji : कडक उन्हाळ्याच्या दिवसांत इचलकरंजी शहरात सोमवारी रात्री काही भागात पावसाने हजेरी लावली. हलकी एक सर येऊन गेली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. बेळगांव जिल्ह्यातील काही भागांतही पावसाच्या सरी बरसल्या. (Rain) येथली यशवंत कॉलनी, कोल्हापूर नाका, जवाहरनगर, स्टेशन रोड, गणेशनगर, शहापूर या परिसरात पाऊस झाला. मात्र, शहराच्या बहुतांश भागात पावसाचा एकही थेंब पडला नव्हता. पावसाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे हवेत थोडासा गारवा निर्माण झाला होता.

नाचणी सत्व ड्रिंक पिल्याने दिवसभर राहाल हायड्रेट; वाचा, कसं बनवायचं घरगुती थंडगार पेय

कागल शहरासह तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने आज हजेरी लावली. रात्री पावणे आठच्या सुमारास १५ मिनिटे पडलेल्या पावसामुळे वाढत्या उष्म्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. सांगाव, सुळकूड, यळगूड, रणदेवीवाडी, पंचतारांकित एमआयडीसी परिसरात पावसाने हजेरी लावली. आज दिवसभर उष्मा वाढला होता. कागल शहर आणि पूर्व भागातील परिसरात गडगडाटासट अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुमारे १५ मिनिटे पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे.

पावसाचा शिडकाव

सोमवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास पन्हाळा शहर व परिसरात पावसाचा शिडकावा झाला. गेल्या आठवड्यापासून पन्हाळा व परिसरात कडाक्याच्या उन्हामुळे कमाल तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या होत्या. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.

follow us