Download App

Maharashtra Rain Update : ह्यो पाऊस काही थांबनाच! नागरिकांनो छत्री जवळच ठेवा कारण…,

राज्यात पुढील पाच दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.

गेल्या काही दिवसांपासून राज्याला अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलंय. आता पुढील पाच दिवसही कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची धार सुरुच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आहे. राज्यातील पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Rain Update) कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीयं. अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्रामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्रात 20 ते 25 मेदरम्यान अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे.

राज्यात आज 20 मे रोजी कोकणातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जालना, परभणी, बीड, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आलायं.

मुंबईतील ‘त्या’ दोन रुग्णांचा मृत्यू करोनाने झाला का?, मनपात रुग्णांना उपचार अन् मार्गदर्शनाची सोय

दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात हीच स्थिती राहणार असून कमाल तापमानात कोणतीही वाढ होणार नाही. तर किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअस घट होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. इथे 60- किमी वेगाने वारे वाहतील. पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

follow us