Monsoon Rains Updates : यंदा जूनचा दुसरा आठवडा उलटून गेला तरी देखील राज्यात मान्सूनच्या पावसाची (monsoon rains)चिन्हे नाहीत. 11 जून रोजी महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून कोकणात स्थिरावला आहे. त्यामुळे मान्सूनची पुढची वाटचाल तूर्तास थांबली असून तो आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) आज (15 जून) वर्तवला आहे. या संदर्भातील माहिती के.एस. होशाळीकर यांनी दिली. 23 जून पासून संपूर्ण भारतामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. (Rainfall across India from June 23; Forecast expressed by Meteorological Department)
Radhakrishna Vikhe Patil : अहमदनगर जिल्हा बँकेची आधुनिकतेकडे वाटचाल
मान्सून दरवर्षी 1 जूनला केरळमध्ये दाखल होतो, मात्र यंदा तो 7 जूनला दाखल झाला. रविवारी, 11 जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यानंतर पुढच्या 4, 5 दिवसात राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्रात मान्सून सुरू होऊन चार दिवस झाले असले तरी अद्याप पाऊस झालेला नाही. त्यामुळे बळीराजासह लोकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) ताज्या अपडेटमध्ये भारतात येत्या चार आठवड्यासाठी पावसाचा विस्तारित श्रेणीचा अंदाज व्यक्त केला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून शुक्रवारी (दि. 23) पासून महाराष्ट्रासह मध्य भारतात मान्सूनचा जोर धरण्याची शक्यता आहे, असा अदाज के. एस. होशाळीकर यांनी व्यक्त केला आहे.
15/6, ERF for rainfall for coming 4 weeks by IMD today,indicates revival of SW Monsoon frm 23 Jun,including central India & Maharashtra
IMD द्वारे संपूर्ण भारतात येत्या 4 आठवड्यांसाठी पावसाचा विस्तारित श्रेणीचा अंदाज:23 जूनपासून मध्य भारत व महाराष्ट्रासह SW मान्सूनचे पुनरुज्जीवन. pic.twitter.com/BDtnloMb2v— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 15, 2023
पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे हिमालयाच्या पलीकडे न गेल्यानं मान्सून खूपच क्षीण झाला आहे. सध्या मान्सून तळकोकणात असला तरी बिपरजॉय चक्रीवादळाने त्यातील आर्द्रता शोषून घेतली. त्यामुळे पुढे जाण्यासाठी पुरेसा वेग नाही. दरम्यान, अद्याप पाऊन न झाल्यानं खरीपाची पेरणी रखडली आहे. त्यामुळं मान्सूनच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तर मान्सून सक्रीय झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असं सांगण्यात आलं.