Raj Kundra News : बांग्लादेशातील हिंसाचार आणि सत्तांतराच्या (Bangladesh News) घटनांनी बांग्लादेशाची जगभरात चर्चा झाली होती. आता पुन्हा बांग्लादेशातील अडल्ट स्टार रिया बर्डेला (Riya Barde) भारतात अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य केल्याचा आरोप रियावर ठेवण्यात आला आहे. खरंतर रिया मूळची बांग्लादेशातील आहे. मात्र बनावट कागदपत्रे तयार करून ती अनेक वर्षांपासून भारतात राहत आहे. या प्रकरणात रोजच धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत.
या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राचं (Raj Kundra) रियाशी कनेक्शन असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. रियाने राज कुंद्राच्या प्रॉडक्शन कंपनीत काम केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या प्रकरणी आपलं नाव येत असल्याने राज कुंद्रा चांगलाच भडकला आहे. राज कुंद्राने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. आपल्यावर होत असलेले सर्व आरोप त्याने फेटाळून लावले आहेत. सर्व आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. या आरोपांमुळे मला प्रचंड मानसिक त्रास झाल्याचे राज कुंद्राने स्पष्ट केले आहे.
Video : गुजरातची सुंदरी ठरली इंडिया मिस युनिव्हर्स; आनंद व्यक्त करताना काय म्हणाली रिया सिंघा?
माझ्याबाबत खोटे आरोप पसरवणाऱ्या लोकांमुळे मी खूप त्रस्त झालो आहे. या रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की एक अप्रवासी व्यक्तीने माझ्या कोणत्या तरी प्रॉडक्शन कंपनीत काम केले होते. मी स्पष्ट करू इच्छितो की मी अशा कोणत्याही व्यक्तीला कधीच भेटलो नाही. मी कधीच कोणत्याही प्रोडक्शन कंपनीचा मालकही नव्हतो किंवा अशा कोणत्याही प्रोडक्शन कंपनीशी कधी संबंधितही नव्हतो जिथे या व्यक्तीने काम केले होते.
हे सर्व निराधार दाव्यांमुळे जनमानसातील माझ्या प्रतिष्ठेचे नुकसान होत आहे. काहीतरी सनसनाटी निर्माण करण्यासाठी आणि मीडियात चर्चेत राहण्यासाठी माझ्या नावाचा चुकीचा उपयोग केला जात आहे. मी नेहमीच माझा बिजनेस प्रामाणिकपणाने केला आहे. त्यामुळे अशा खोट्या आरोपांनी मी कधीही सहन करणार नाही.
यानंतर राज कुंद्राचे वकील प्रशांत पाटील यांनी सांगितले की या प्रकरणात कायदेशीर कार्यवाही करण्याचे नियोजन केले जात आहे. सोशल, डिजीटल आणि प्रिंट मीडियात काही बातम्या अशा आल्या आहेत की काही बेकायदेशीर अप्रवासींना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. बनावट अहवालांत आरोपींना माझे क्लाइंट राज कुंद्रा यांच्याशी जोडले जात आहे. त्यांच्या बाबतीत गैरसमज निर्माण करण्यासाठी आणि त्यांना बदनाम करण्यासाठीच जाणूनबुजून हा प्रकार केला जात आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारे दिशाभूल करणारी माहिती प्रसारीत केली म्हणून माझे क्लाइंट मुंबई सायबर पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत, असे वकील प्रशांत पाटील यांनी सांगितले.
Shilpa Shetty अन् राज कुंद्रावरील फसवणुकीच्या आरोपावर वकीलाचं स्पष्टीकरण, म्हणाले