Raj Thackeray : 10 वीच्या निकालाचा ‘तो’ किस्सा, राज म्हणाले, ‘…म्हणून आई अचानक रडायला लागली’

Raj Thackeray and Mother Madhuvanti Thackeray Interview : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मतोश्री मधुवंती ठाकरे यांची एबीपी माझा या वृत्तवाहिनीने एक मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये राज यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि विशेषतः बालपणींच्या आठवणींवर यावेळी मधुवंती ठाकरे यांनी अनेक किस्से सांगितले. अशाप्रकारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मतोश्री मधुवंती ठाकरे या आई आणि […]

RAJ AND MOTHER

RAJ AND MOTHER

Raj Thackeray and Mother Madhuvanti Thackeray Interview : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मतोश्री मधुवंती ठाकरे यांची एबीपी माझा या वृत्तवाहिनीने एक मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये राज यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि विशेषतः बालपणींच्या आठवणींवर यावेळी मधुवंती ठाकरे यांनी अनेक किस्से सांगितले. अशाप्रकारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मतोश्री मधुवंती ठाकरे या आई आणि मुलाची मुलाखत होण्याची ही पहिलीच वेळ होती.

जेव्हा मी सांगतो पुन्हा येईन….; फडणवीसांच्या विधानाने चर्चांना उधाण

यावेळी राज ठाकरे हे लहाणपणी अभ्यासात कसे होते? त्यांच्या 10 वी च्या निकालावर नेमकी घरी काय वातावरण निर्माण झालं होत? असा प्रश्न विचारला असता. यावर राज ठाकरे आणि त्यांच्या मतोश्री मधुवंती ठाकरे यांनी अनेक किस्से सांगितले.

जुन्या आठवणींना उजाळा देताना राज म्हणाले, ‘माझा 10 वीचा निकाल लागला त्या दिवशी बाळासाहेबांनी माझ्या आईला मी नापास झाल्याचं सांगितलं होत. हे ऐकल्यानंतर ती अचानक रडायला लागली. तर मी इकडे अंघोळ करत होतो. जयदेव यांनी दार ठोठावलं. दार घडचताच त्यांनी माझ्याकडे रागानं बघितलं. वरती बोलावल्याचा निरोप दिला. त्यावेळी प्रचंड घाबरलो होते. मात्र, वरती गेल्यावर बाळासाहेब माझ्याशी मस्करी करत होते, हे लक्षात आलं.’

Exit mobile version