राज्याच्या निवडणुकांच्या रिंगणात सातत्याने अपयशला सामोरे जाणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती वगैरे असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. मात्र या भेटीचे राजकीय अर्थ निघतातच हे महाराष्ट्रालाही माहीत आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो की, राज ठाकरे जेव्हा जेव्हा फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे किंवा अन्यराजकीय नेत्यांच्या भेटी घेतात त्या-त्यावेळी राजकीय वातावरण का तापतं याचाच घेतलेला हा आढावा…
मराठी यायलाच पाहिजे पण, हिंदी ही देशाची भाषा… फडणवीसांचा हिंदीला फुल सपोर्ट
राज ठाकरे यांच्या अलिकडच्या सभा महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय खळबळ उडवत आहेत. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या त्यांच्या भेटींमुळे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये युतीच्या चर्चांना बळ देत आहे. एकूणच काय तर, मनसेच्या राजकीय पिचवर मर्यादित यशानंतर राज ठाकरे यांच्या राजकीय हालचाली आणि त्यांची भविष्यातील भूमिका महाराष्ट्राच्या राजकीय परिदृश्यावर प्रभाव टाकू शकते अशी शक्यता आहे.
राज ठाकरेंना मिळालेलं राजकीय यश बुडबुड्या सारखं
राज ठाकरे हे शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरून राजकारणात आले. एकेकाळी बाळासाहेबांचे राजकीय वारस म्हणून राज ठाकरेंकडे पाहिले जात होते. परंतु, उद्धव ठाकरे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर राज ठाकरे पूर्वीच्या शिवसेनेपासून म्हणजेच आताच्या ठाकरे गटापासून वेगळे झाले.
त्यानंतर राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला. यात राज ठाकरेंच्या पक्षाला मिळालेले राजकीय यश हे पाण्याच्या बुडबुड्यासारखे होते. कारण २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत मनसेला फक्त एकच जागा जिंकता आली आणि २०२४ मध्ये मनसेला खातंही उघडता आले नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्णपणे अपयशी ठरलेले राज ठाकरे आपल्या पक्षाचे राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे.
वक्फ बोर्ड कायदा जैसे थे! सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्राला धक्का, सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश
शिंदे अन् राज ठाकरेंच्या भेटीचा अर्थ काय?
एकनाथ शिंदेंनी नुकतीच राज ठाकरेंची निवास्थान शिवतीर्थवर जाऊन घेतलेली भेट शिंदे जरी राजकीय नव्हती वगैरे असे सांगत असले तरी, राजकारणात जेव्हा जेव्हा नेते भेटतात तेव्हा त्यामागे राजकीय हेतू असतो त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भेटीतही काही ना काही राजकीय हेतू असणारचं हे नक्की. कारण, आगामी काळात महानगरपालिकांचं बिगुल वाजणार असून, २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे आणि ठाकरेंची ही पहिलीच भेट आहे.
विधानसभेत राज पुत्राचा पराभव
शिंदे आणि राज ठाकरेंची भेटी खास असण्याचे आणखी एक कारण म्हणजे राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेत टशन पाहण्यास मिळाली होती. या मागचं कारण म्हणजे शिंदेंनी माहीम मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या विरोधात सदा सरवणकर यांना मैदानात उतरवले होते. तर, उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघातून महेश सावंतांना उमेदवारी दिली होती. या तिरंगी लढतील ठाकरे गटाचे सावंत विजयी झाले अन् राजपुत्र असलेल्या अमित ठाकरेंना पराभवाला सामोरे जावे लागले.
अमित ठाकरे यांचा निवडणुकीतील पराभव हा राज ठाकरेंच्या राजकारणासाठी मोठा धक्का होता. निवडणूक निकालानंतर माहीम मतदारसंघातून शिंदेंनी उमेदवार मागे न घेतल्याने राज ठाकरे एकनाथ शिंदेंवर नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे आणि ठाकरेंची झालेली ही भेट आगामी पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत नाराजी दूर करण्यासाठी असल्याची पहिली पायरी असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नव्हे तर, या भेटीमुळे दोन्ही नेत्यांमध्ये युतीची चर्चाही सुरू झाली आहे.
Video : शरद पवारांनी फावल्या वेळेत नवा इतिहास लिहावा, गोपीचंद पडळकरांची खोचक टीका
राज-उद्धव यांच्या भेटीचा चौकार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळपास चार वेळा भेट झाली आहे. जरी या भेटी कौटुंबिक कार्यक्रमांदरम्यान झाल्या असल्या तरी, त्यामधून राजकीय अर्थ काढले जात आहेत. कारण, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणाची व्याख्या आणि गणित बदलले गेले असून, ठाकरे बंधूंच्या राजकारणावर संकट येऊ लागले आहे.
ठाकरे बंधूंच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह
गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी बघता ठाकरे बंधूंच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे एकनाथ शिंदे हे खरी शिवसेना असल्याच्या लढाईत यशस्वी झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर त्यांचे राजकारण वाचवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
तर, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना अस्तित्वाच्या पहिल्याच निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने आणि राज्यात मनसेला एकही उमेदवार निवडणूक न आणता आल्याने बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारस मानले जाणारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्याही राजकारणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकूण झालेल्या भेटींकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात होते आणि गे दोन्ही नेते एकत्र येण्याचे अंदाजही बांधले जाऊ लागले होते.
मराठी यायलाच पाहिजे पण, हिंदी ही देशाची भाषा… फडणवीसांचा हिंदीला फुल सपोर्ट
राज ठाकरे यांचे राजकारण महत्त्वाचे का आहे?
२००५ पासून, जेव्हा राज ठाकरे यांनी पूर्वीच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत स्वतःचा पक्ष स्थापन केला, तेव्हापासून ते त्यांची राजकीय ओळख निर्माण करण्यासाठी सतत संघर्ष करत आहेत. पक्षाची विचारसरणी वारंवार बदलूनही, आकडेवारीने कधीही त्यांना साथ दिली नाही. राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेपासून ते हिंदुत्वाच्या अजेंड्यापर्यंत सर्व मुद्दे आजमावून पाहिले पण, त्यांना यश मिळू शकले नाही. दुसरीकडे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी त्यांची पहिली निवडणूक जिंकली नसली तरी, मुंबईच्या राजकारणात मनसेचा प्रभाव आहे. मनसेचा केवळ मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नवी मुंबई, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर भागातही लक्षणीय प्रभाव आहे.
राज ठाकरे कदाचित एकटे निवडणुका लढवून काहीही साध्य करू शकणार नाहीत, परंतु जर त्यांना कोणत्याही पक्षाचा पाठिंबा मिळाला तर, त्यांच्यात मोठा राजकीय चमत्कार करण्याची ताकद आहे. त्यामुळेच जेव्हा जेव्हा कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता राज ठाकरेंना भेटतो तेव्हा राजकीय वातावरण तापते. त्यामुळे जर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले तर, राजकारणात हरवलेला ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा वर येऊ शकतो. त्याच वेळी, जर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंशी हातमिळवणी केली तर, उद्धव ठाकरे यांचे राजकारण पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते आणि बीएमसीवर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित होऊ शकते. त्याचप्रमाणे, राज ठाकरे हे भाजपसाठीही खूप महत्वाचे ठरू शकतात.
मोठी बातमी : रणजीत कासले पुण्यात होणार सरेंडर; कराड स्टाईल व्हिडिओ जारी करत दिली अपडेट
खरी लढाई बीएमसीसाठीच
विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष मुंबईतील बीएमसी निवडणुकीवर आहे. महाराष्ट्रात भाजपने सत्ता काबीज केल्यानंतर आता ते मुंबईत आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. बीएमसी सध्या उद्धव ठाकरेंकडे असून, बीएमसीवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी फडणवीसांकडून कसोशिने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे शिंदे फडणवीस आणि राज ठाकरेंच्या झालेल्या भेटीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले असून, बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये, उद्धव ठाकरेंसमोर आता त्यांचा शेवटचा राहिलेला बीएमसीचा किल्ला वाचवण्याचे आव्हान आहे.
तर, दुसरीकडे निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या नव्या सरकारमध्ये शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. अशा परिस्थितीत, शिंदे यांना बीएमसीमध्ये त्यांच्या शिवसेनेला सत्तेत आणायचे आहे, त्यामुळे शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीकडे पाहिले जात आहे. आता या सर्व राजकीय घडामोडींमध्ये राज ठाकरे त्यांचे स्वतःचे आणि पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी कोणतं राजकीय पाऊल उचलतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.