सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारताच समर्थक ‘ट्रोळ्या‘ तुम्हाला देशद्रोही… गांधीजींच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे सत्ताधाऱ्यांना टोले

Raj Thackeray criticize BJP Government राज ठाकरेंनी गांधीजींच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली आणि यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

Raj Thackeray

Raj Thackeray

Raj Thackeray criticize BJP Government on the ocasion of Mahatama Gandhi Birth Anniversary : आज राष्ट्रपिता महात्मा गांधींची जयंती आहेत. पंतप्रधान मोदींनी राजघाटावर जात गांधीजींना आदरांजली वाहिली. त्यानंतर राज ठाकरे यांनी मात्र गांधीजींच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली तर अर्पण केलीच पण यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे आणि त्यांच्या ट्रोलर्सकडून तुम्हाला देशद्रोही ठरवले जाणे यावरून त्यांनी ताशेरे ओढले.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

आज महात्मा गांधीजींची जयंती. खरंतर कुठल्याही महापुरुषाची आठवण फक्त त्याच्या जयंतीला आणि पुण्यतिथीला काढायची, त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करायचा आणि फोटो काढायचे इतक्या पुरतेच आपल्याला महापुरुष आठवतात. स्मारकं म्हणजे पुतळे ही आपली आवडती व्याख्या आणि आता पुतळ्यांच्या सोबत फोटो ही आपली नवीन श्रद्धांजली. असो.

साखरेच्या किंमती घसरणार? वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर सरकारने उचललं मोठं पाऊल

पण सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात गांधीजींची आठवण खरंतर अधिक प्रकर्षाने यायला हवी. कारण त्यांनी सत्तेला प्रश्न विचारायला शिकवलं… आणि प्रश्न विचारणं हे सद्य सत्ताधाऱ्यांना आवडत नाही. प्रश्न विचारले की, ते आणि त्यांच्या समर्थकांच्या ‘ ट्रोळ्या ‘ तुम्हाला देशद्रोही ठरवायला आतुरच असतात. आज आंदोलनांकडे संशयाने पाहिलं जातं, आंदोलकांवर बळाचा वापर होतो आणि निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा वेळी गांधीजींची सर्वाधिक गरज आहे.गांधीजींनी या देशाला दिलेली सर्वात मोठी गोष्ट कोणती? मला वाटतं—सत्तेला ‘नाही’ म्हणण्याचं सामान्य माणसाचं सामर्थ्य!

सरकारकडे कायदा असतो, सत्तेची पाशवी शक्ती असते, सोयीने कायदा बदलण्याची शक्यता असते आणि या कायद्याच्या आधारावर गुन्हेगार ठरवण्याची शक्ती ते स्वतःकडे अबाधित ठेवतात. पण एवढं सगळं असूनही सामान्य माणसाच्या सारासार विचार करण्याच्या क्षमतेवर, त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीवर सरकारची मालकी नसते हे गांधीजींनी दाखवून दिलं. सध्या सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीजच्या काळात या क्षमतेवरच घाला घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे सर्वानी सावध राहायला हवं..

नवरात्रीसाठी देवीची मूर्ती आणायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला; भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू 18 जण जखमी

लोकशाहीत जनता सार्वभौम असते याची सत्ताधाऱ्यांना अधूनमधून आठवण करून दिली पाहिजे. राजकीय पक्षांची आंदोलनं, मोर्चे आणि त्यातला जनसहभाग हे सर्व सत्ताधाऱ्यांना जाणीव करून देण्याचा मार्ग आहे हे विसरू नये. आणि हेच गांधीजींच्या शिकवणीचं सार आहे. म्हणून गांधीजी सत्ताधाऱ्यांना फक्त श्रद्धांजली पुरते हवे आहेत बाकीचे गांधीजी त्यांच्या सोयीचे नाहीत. पण लोकशाहीला गांधीजी कायम आवश्यक असतात हे आपण विसरता कामा नये. महात्मा गांधीजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन !

 

Exit mobile version