Raj Thackeray : मनसेचा आज १७ वा वर्धापन दिन, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे काय बोलणार यांची चर्चा?

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) १७ वा वर्धापन दिन ९ मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सायंकाळी सहा वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे सभा होणार आहे. दरवर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (89)

Raj Thackeray

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) १७ वा वर्धापन दिन ९ मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सायंकाळी सहा वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे सभा होणार आहे. दरवर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे

मनसेकडून पक्षाचा टीझर

वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून “नव्या दमाने, नव्या आयुधांसह… नवनिर्माणास सज्ज !”ची या कॅप्शनखाली एक टीझर व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. मनसे अधिकृत या मनसेच्या अधिकृत अकौंटवरून या व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.

 

हेही वाचा : Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो?

ट्रेलरच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज दाखवण्यात आले आहेत. त्यानंतर मनसेचा झेंडा फडफडतो. त्यानंतर मनसे काढलेल्या मोर्चाची दृश्ये आणि राज ठाकरे यांच्या मागील सभेचे दृश्य दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर “नव्या दमाने, नव्या आयुधांसह… नवनिर्माणास सज्ज”, असा संदेश देण्यात आला आहे.

९ मार्चला मनसेचा वर्धापन दिन ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे साजरा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे हे देखील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ठाकरे यावेळी नेमके काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे काय बोलणार यांची चर्चा

राज्यात मागील काही दिवसापासून अनेक मोठया घडामोडी घडल्या आहेत. या घडामोडींबाबत काही दिवसापूर्वी एका मुलाखतीमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांना विचारले असता त्यांनी मोठं विधान केलं. महाराष्ट्रात सध्या हे जे काही चालू आहे त्यावर मी शिवतीर्थावर गुढीपाडव्यादिवशी सविस्तर बोलणार आहे. असं म्हटलं होत. त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे नक्की काय बोलणार याची चर्चा रंगली आहेत.

दरम्यान मागील आठवड्यात पिंपरी आणि कसबा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे यावरही राज ठाकरे काय बोलणार, हे पाहणं महत्वाचं आहे.

Exit mobile version