Raj Thackray On Dada Kabutarkhana : कोण जैन लोक आहेत, जे कबुतरावर बसून फिरायला जातात? असा खोचक प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंनी काय त्या कबुतरांचं. कबूतर मेले नाही पाहिजे. माणसं मेली तर चालतात असे म्हणत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. दादरच्या कबुतर खान्याचा प्रश्न राजकीय होता. पण त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही, कुठे रिस्पॉन्स द्यायया हे आम्हाला कळत असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.
उंदीर गणपतीचं वाहन म्हणून घरात ठेवतो का?
कबुतरखान्यांच्या मुद्द्यावरुन राजकीय वाद पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, आम्हाला कुठे प्रतिसाद द्यायचा, हे कळते. काही जणांना कबुतरांचा (Pigeons) मुद्दा वाद होईल, अशा पद्धतीनेच लावून धरायचा होता. मात्र, त्यांना लक्षात आले की, आमच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले. तुमच्या घरात चार उंदीर झाले. त्याचं काय करता तुम्ही… गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का. नाही ना. असे उदाहरण देत राज ठाकरेंनी जैन समाजावर हल्लाबोल केला.
कबुतरांच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्याला किती धोका; वाचा, डॉ. कल्याण गंगवाल नक्की काय म्हणाले?
असे कोण जैन लोकं आहेत जे कबुतरांवर बसून फिरायला जातात. कोण जैन लोक आहेत, जे कबुतरावर बसून फिरायला जातात? असा खोचक प्रश्न उपस्थित करत ठाकरेंनी काय त्या कबुतरांचं. कबूतर मेले नाही पाहिजे. माणसं मेली तर चालतात. रेल्वेखाली माणसं जातात, खड्ड्यांमध्ये माणसं जातात. माणसांपेक्षा कबूतरं महत्त्वाचे आहेत. तो राजकीय विषय आहे. त्यांना राजकारण करायचं होतं. पण त्यांना कळलं की रिस्पॉन्स मिळत नाही. आम्हाला रिस्पॉन्स द्यायचा नव्हता. ते विषय भरकटवतात, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
कबुतरखाना विषय वादाचा नाही, समाजाचा आहे; मु्ख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट
रस्ते बनवणं हा आपल्याकडे धंदा, ते खराब झालेच पाहिजेत
‘रस्ते बनवणं हा आपल्याकडे धंदा आहे, ते खराब झालेच पाहिजेत’ असे त्यांनी म्हटले आहे. सर्व साटंलोटं आहे. रस्ते खराब झाले की टेंडर निघतं. खड्डे बुजवण्याचं टेंडर निघतं. कंत्राटदाराला शिक्षा होत नाही. अनेक वर्षापासून हे सुरू आहे. लोक खड्ड्यात पडून मरत आहेत. तरीही लोक ज्यांच्यामुळे घडतंय त्यांनाच मतदान करत आहेत. त्यामुळे लोक आपल्याला मतदान करत असल्याने तेही काही करत नाहीत’ असे राज ठाकरे म्हणाले.
बेस्ट पतपेढी निवडणूक छोटी गोष्ट
बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या संदर्भात निकाल आले आहेत, असं पत्रकारांनी विचारलं असता, राज ठाकरे म्हणाले की, “हो मी वाचलं… काय आहे ते? मला माहितीच नाही हा विषय… निवडणुका स्थानिक आहेत.. पतपेढी का काय ना… ठीक आहे… छोट्या गोष्टी आहेत रे… तुम्हाला ना 24 तास काहीतरी दाखवायला हवं, याची आग लावा, त्याची आग लावा’ असं म्हणत राज ठाकरेंनी विषय टाळला.