तरुणांनी राजकारणात यावं, ते चुकीच्या लोकांच्या हातात पडलंय : राज ठाकरे

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेमध्ये ‘नवं काहीतरी’ या विषयावर व्याख्यान दिलंय. यावेळी राज ठाकरे यांनी राजकारणाची घसरलेली पातळी, नगर नियोजन, राजकारण, महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, राजकारणपासून दूर राहणारा समाज आदी गोष्टींवर प्रकाश टाकला. विविध गोष्टींना कसे फाटे फुटतात? प्रवक्ते कसे बोलतात, काही ऐकूच नये, पाहू नये असे वाटते. […]

Raj Thackeray 1

Raj Thackeray 1

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेमध्ये ‘नवं काहीतरी’ या विषयावर व्याख्यान दिलंय. यावेळी राज ठाकरे यांनी राजकारणाची घसरलेली पातळी, नगर नियोजन, राजकारण, महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, राजकारणपासून दूर राहणारा समाज आदी गोष्टींवर प्रकाश टाकला. विविध गोष्टींना कसे फाटे फुटतात? प्रवक्ते कसे बोलतात, काही ऐकूच नये, पाहू नये असे वाटते.

राज ठाकरे म्हणाले, 1995 पूर्वीचा आणि 1995 नंतरचा महाराष्ट्र यात मोठा फरक आहे. 1995 पूर्वीचं आणि नंतरचं पुणं यात देखील फरक दिसून येतोय. आता चार चार पुणे झालं आहे. अनेक वर्षांपासून मी भाषणांमध्ये सांगत होतो, मुंबई बर्बाद व्हायला मोठा काळ गेला. पण, पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नसल्याचंही ते म्हणाले. या दरम्यानच्या काळात साहित्य, नाटक, चित्रपट आणि राजकारण बदललं. बदल गरजेचा असतो हे मान्यचं आहे पण बदल आपल्या जीवावर उठणारा असल्यास काय करायचं? असं राज ठाकरे म्हणाले.

1995 पर्यंत सगळ्या चळवळी सगळे राजकीय पक्ष मध्यमवर्गीयांच्या हाती होत्या. ते उच्चवर्गीय आणि गरिबांमधील दुवा होते. 95 नंतर हे संपूर्ण चित्र बदललं. राजकारणाला मोठ्या वर्गाची गरज आहे तो त्याला तुच्छ मानायला लागला, असं राज ठाकरे म्हणाले. प्रत्येक वर्गातील विचार करणारी लोकं मागं झाली आणि सगळा स्तर घसरायला लागला.

1995 पूर्वी आणि नंतर महाराष्ट्रात झालेल्या भ्रष्टाचारात फरक आहे. आपण सुशिक्षित असून चालणार नाही, आपल्याला काय करायचंय त्याच्याशी म्हणून आपण राजकारणापासून दूर राहतो. पण, आपलं संपूर्ण आयुष्य राजकारणाशी बांधिल आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

Exit mobile version