Raj Thackeray : टोल आंदोलनाचं काय झालं? असं कुणी विचारलं तर, त्यांना मुंबईचं उदाहरण द्या!

सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले.

Raj Thackeray

Raj Thackeray

मुंबई : विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी महायुती सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेत टोल माफीची घोषणा केली आहे. या निर्णयानुसार मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर मनसे अध्यक्ष  राज ठाकरेंनी (Raj Thackeray) प्रतिक्रिया देत राज्य सरकराचे कानही टोचले आहेत. राज्य सरकारचा हा निर्णय सुत्य असून, गेली अनेक वर्ष आमचा हा लढा सुरु होता त्याला यश मिळालं आहे, उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी मिळाली. मात्र, हा निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता कायम असावा नाहीतर निवडणुकीनंतर त्याचा बोजा जनतेवर माराल असे राज यांनी म्हटले आहे. (RaJ Thackeray First Reaction on Mumbai Tool Free Decision)

राज ठाकरेंची प्रतिक्रिया काय?

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती (Toll) मिळणार आहे. याबद्दल राज ठाकरे यांनी एमएमआर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचा अभिनंदन केले आहे.

टोल माफी ते कौशल्य विद्यापीठाला रतन टाटांचे नाव; शेवटच्या बैठकीत शिंदेंचे धडाकेबाज 19 निर्णय

टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला… आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही. पण असो… किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी.

‘पवारांना फक्त खुर्चीच दिसते’; सिद्दीकींच्या हत्येनंतर राजीनामा मागताच फडणवीसांचा टोला

आज मुंबई टोलमुक्त झाली पण त्या आधी किती लोकांनी टोलच्या या खेळात, संपत्तीच्या राशी उभ्या केल्या याचा हिशोबच नाही. खरंतर याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. पण ती होईल याची फारशी खात्री नाही, कारण कोणी कोणाला पकडायचं हा प्रश्न आहे. पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले हे बरे झाले. महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे ‘टोलच्या आंदोलनाचं काय झालं?’ असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन.

 

कोणत्या पाच टोलनाक्यावर असणार टोलमाफी?

Exit mobile version