Raj Thackeray Mira Bhayandar Sabha : मनसे प्रमुख राज ठाकरे मिरा भाईंदर येथून जाहीर सभेतून सरकारच्या धोरणांवर जोरदार प्रहार केला आहे. याच भागात काही दिवसापुर्वी याच भागात मोठा मोर्चा निघाला होता. (Thackeray) दरम्यान, हे लोक चाचपडून पाहत आहेत की, इथं हिंदीचा काही प्रयोग जमतो का? मात्र, जर हिंदी सक्तीचा प्रयत्न केला तर फक्त दुकानं नाही संपूर्ण शाळा बंद करून टाकेर असा थेट इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे.
कानावर मराठी समजणार नसेल तर कानाखाली बसणारच असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, साधा छोटा प्रसंग होता. मोर्चाला जमलेले महाराष्ट्र सैनिक पाणी प्यायला गेले होते, त्या माणसाने विचारलं कशासाठी मोर्चा काढता, मनसे सैनिकांनी सांगितलं की, हिंदी सक्तीविरोधात मोर्चा सुरू आहे, त्यानंतर तो म्हणाला की इथे हिंदीच बोलतात. त्या माणसाच्या अरेरावीमुळे त्याच्या कानफटात बसली. मग व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. तुमच्या कानाखाली मारली होती का? असाही प्रश्न त्यांनी विचारला.
माजाचं राजकारण, गुंडांना गंगास्नान; उद्धव ठाकरे यांचा CM फडणवीसांवर जोरदार निशाणा
अजून नाही मारली, विषय समजून न घेता, काय झालं माहीत नसताना कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन बंद पुकारता, तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाही का इथे. दुकानं बंद करून किती दिवस राहणार? आम्ही काही घेतलं तर दुकानं सुरू राहतील, महाराष्ट्रात राहाताय शातं पणे राहा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडत आहेत, इतर शाळात मराठी सक्तीची केली पाहिजे, ते सोडून हिंदी सक्तीची करत आहात. कोणाच्या दबावाखाली? कोण दबाव टाकतं तुमच्यावर? केंद्राचं हे धोरण पूर्वीपासूनचं आहे, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.