बीड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)बीड (Beed) जिल्ह्यातील परळीच्या कोर्टात हजेरी लावणार आहेत. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी परळी कोर्टाने (Parli Court) राज ठाकरे यांना समन्स बजावले होते.
2008 ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी परळी-गंगाखेड रोडवरील धर्मापुरी फाटा येथे एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक केली होती.
या प्रकरणात राज ठाकरेंना हे समन्स बजावण्यात आलं आहे. यापूर्वी 3 जानेवारी आणि नंतर 12 जानेवारीला राज ठाकरेंना परळी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. पण, 12 तारखेला राष्ट्रमाता जिजाऊ जयंती आहे, त्यामुळे न्यायालयाने तारीख वाढवून दिली होती.
अखेर आज राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानावरून विमानतळाकडे रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांना कोर्टात 11 वाजता हजर राहण्याचे समन्स आहे.