Rajan Patil On Ajit Pawar : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यानंतर जल्लोष करताना माजी आमदार राजन पाटील यांचे सुपुत्र विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान देत सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांना नाय असं म्हणत त्यांनी अजित पवार यांना आव्हान दिले. सध्या सोशल मीडियावर बाळराजे पाटील यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून सोलापूरच्या राजकारणात यावर आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.
तर दुसरीकडे आता या प्रकरणात माजी आमदार राजन पाटील यांनी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांची माफी मागितली आहे. माध्यमांशी बोलताना माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) म्हणाले की, विरोधक अपप्रचार करुन आमचं आणि आमच्या गावाचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या गावात आर. आर. पाटील यांची संकल्पना आम्ही राबवत आहोत. आमच्या गावात कधीही निवडणूक झालेली नाही आणि ही निवडणुक झाली त्यामुळे तरुण पोरं थोडी उत्साहित असतात त्यामुळे त्यांने (बाळराजे पाटील) तो उत्साहा साजरा करण्याचा प्रयत्न केला. मात्र आमच्या मुलाने जेकाही वक्तव्य केले त्यांचा मी समर्थन करत नाही. तो राजकारणात लहान आहे. त्याच्या तोडातून न कळत जे काही वक्तव्य गेला असेल तर मी वडील म्हणून मोठे पवारसाहेब आणि अजित पवार यांची माफी मागतो. त्यामुळे आता हा विषय थांबवावा.
अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवारांचा (Sharad Pawar) आमच्या प्रगतीत मोठा वाटा आहे. अजित पवार आणि शरद पवारांची मी क्षमा मागतो. बाळराजेंकडून (Balraje Patil) चुकून गेलेल्या शब्दाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
बिबट्यांचे नागरीकांवर हल्ले रोखण्यासाठी महायुती शासनाच्या प्रभावी उपाययोजना; आ.आशुतोष काळे
नेमकं काय म्हणाले होते बाळराजे पाटील?
अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्यानंतर नगरपंचायत कार्याबाहेर जल्लोष करताना बाळराजे पाटील यांनी कॅमेऱ्याकडे बोट दाखून अजिप पवार सगळ्यांचा नाद करा पण अनगरकरांचा नाय असं म्हटले होते. यानंतर सोशल मीडिायावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता माजी आमदार राजन पाटील यांनी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर माफी मागितली आहे.
