मुंबई : वरळी अँड रन प्रकरणा नंतर शिवसेना उपनेते राजेश शहा यांना पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी अधिकृत पत्रक काढत शिवसेना उपनेते पदावरून राजेश शहा यांना कार्यमुक्त केल्याचे स्पष्ट केले आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणात राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा हा मुख्य आरोपी असून त्याच्या विरोधात वरळी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर गाडी कलानगरमध्ये बंद पडली होती. ती गाडी राजेश शाह यांनी अज्ञातस्थळी लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आणि गाडीवरील पक्षाचं चिन्ह, नंबरप्लेट बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. राजेश शाह या प्रकरणात नुकताच जामीन मिळाला होता. (Mumbai BMW Hit & Run Case Accused Mihir Shah Father Rajesh Shah Removed From ShivSena Deputy Leader)
Maharashtra | Shiv Sena removes Rajesh Shah, father of Mihir Shah, the accused in the Worli hit and run case, from the post of deputy leader of the party.
He was relieved from the post after the order of CM Eknath Shinde.
— ANI (@ANI) July 10, 2024
नेमकी घटना काय?
वरळीत रविवारी (7 जुलै) पहाटे 5:30 वाजता एक कोळी दाम्पत्य मासे आणण्यासाठी बाहेर पडलं होतं. त्यावेळी वरळीतील अॅट्रीया मॉल जवळ त्यांना मासे घेऊन परतत असताना एका फोरव्हिलरने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेमुळं ते दोघेही कारच्या बोनटवर पडले. वेळीच नवऱ्याने बोनटवरून बाजूला उडी टाकली. मात्र महिलेला बाजूला होता आलं नाही. तर अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने गाडी पळवली. त्यात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला.
मुलाला वाचवण्यासाठी राजेश शाहांची धडपड
वरळी येथील भीषण अपघातानंतर मुख्य आरोपी असलेल्या मिहीर शाह याने घटनास्थळावरून पळ काढला. तर, त्याचे वडील असणाऱ्या राजेश शाह यांनी त्याला वाचवण्यासाठी गाडीवरील पक्षाचे चिन्ह आणि नंबरप्लेट काढून ती बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर, अपघात झालेली गाडी टो करण्यासाठी टोव्हिंग व्हॅनही पाचरण करण्यात आली होती. तसेच राजेश यांनी आरोपी मिहीरच्या निर्दयी कृत्यानंतरद त्याला पळून जाण्याचा सल्ला दिल्याचं समोर आलं आहे.
मी मुख्यमंत्री असेपर्यंत अन्याय होऊ देणार नाही
वरळीतील घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्याच्या जनतेला मी राज्याचा मुख्यमंत्री असेपर्यंत कोणालाही, मग तो श्रीमंत असो, प्रभावशाली असो, किंवा नोकरदार किंवा मंत्र्यांची मुलं असो, किंवा कोणत्याही पक्षाशी संबंधित असो, त्याला वाचवले जाणार नसल्याचे सांगत कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले दिले होते. त्यानंतर अखेर राजेश शाह यांची शिवसेनेच्या उपनेते पदावरून गच्छंती करण्यात आली आहे.