Download App

Rajesh Tope : मराठवाड्यात शरद पवारांना मोठा धक्का! करोना वॉरियर ठरलेले राजेश टोपे पराभूत

मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता मनोज जरांगे पाटील गेल्या दीड वर्षांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाच्या दरम्यान

  • Written By: Last Updated:

Rajesh Tope Ghansawangi  : गेल्या अनेक वर्षांपासून घनसावंगी या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार ) नेते राजेश टोपे यांच्या कुटुंबियांचं वचर्स्व राहिलं. तसंच, राजेश टोपे यांच्यामुळे हा मतदारसंघ सतत चर्चेत राहिला. (Rajesh Tope) करोना काळातील करोना वॉरियर म्हणून त्यांची ख्याती झाली. त्यानंतर महायुती सरकारच्या काळात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याबरोबर त्यांची झालेली जवळीकी सर्वांनीच पाहिली. त्यामुळे मराठा फॅक्टर, करोना काळातील कार्य अन् शरद पवारांच्या समर्थनामुळे ते यंदाही बाजी मारतील अशी आशा होती. परंतु, ही आशा आता पुरती मावळली.

औरंगाबाद पूर्व मतदारसंघात मतांच्या फुटीचा इम्तियाज जलील यांना फटका; अपक्षांची किती घेतली मत?

मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता मनोज जरांगे पाटील गेल्या दीड वर्षांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाच्या दरम्यान एक चेहरा सतत त्यांच्या बाजूला दिसत राहिला. तो म्हणजे राजेश टोपे यांचा. मनोज जरांगे यांच्या मांडीला मांडी लावून ते त्यांची समजूत काढत असत. महत्त्वाच्या चर्चांमध्ये सहभागी होत असत. त्यामुळे मराठा समाजाची मतं राजेश टोपेंना मिळतील अशी आशा होती. परंतु, मराठा फॅक्टर त्यांच्या कमी आला नाही.

घनसावंगीचा राजकीय इतिहास?

घनसावंगी विधानसभा मतदारसंघ हा जालना जिल्ह्यात असून २००८ च्या मतदारसंघ फेररचनेनंतर अस्तित्वात आला आहे. त्यापूर्वी हा भाग अंबड विधानसभा मतदार संघात होता. २००८ मध्ये घनसावंगी तालुका आणि अंबड आणि जालना तालुक्यातील काही गावांचा मिळून घनसावंगी हा नवा विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आला. विशेष म्हणजे हा मतदारसंघ जालना जिल्ह्यात असला तरी तो परभणी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो. घनसावंगी हा भाग १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. तेव्हापासून या भागावर राजेश टोपे यांच्या कुटुंबियांचे वर्चस्व आहे. राजेश टोपे हे या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले होते. साखर कारखान्यांमुळे राजेश टोपे यांचा या मतदारसंघावर प्रभाव होता.

follow us