Download App

राम शिंदेंचा रोहित पवारांना मोठा धक्का! ‘त्या’ बंडखोर नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Ram Shinde blow to Rohit Pawar Rebel corporators join BJP : अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar Politics) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या (Rohit Pawar) गटातून बाहेर पडलेले बंडखोर आठ नगरसेवक, काँग्रेसचे तीन, अशा 11 नगरसेवकांनी मुंबईत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde), मंत्री गिरीश महाजन आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश झाला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नगर पंचायतीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटातील आणि काँग्रेसच्या 11 नगरसेवकांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, विजय चौधरी या वेळी उपस्थित होते.

हात धुवून मागे लागा, अजितदादाचं तक्रार घेऊन आले पाहिजेत; शाहंच्या कानमंत्राने भुवया उंचावल्या

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नगरसेवकांचे पक्षात स्वागत केले. बावनकुळे यावेळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकसित भारताच्या प्रयत्नांना समर्थ साथ देत आहेत. यामुळेच वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. आजच्या प्रवेशामुळे कर्जत – जामखेड मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार गट पूर्णपणे मोकळा झाला आहे.

डोनाल्ड ट्रम्पचा नवा फतवा…अमेरिकेतील परदेशी विद्यार्थ्यांचं पुन्हा टेन्शन वाढलं, सोशल मीडिया वेटिंग म्हणजे काय?

कर्जतमध्ये सत्तांतर…

आमदार रोहित पवार गटातील 15 नगरसेवकांपैकी 11 नगरसेवक सत्तेतून बाहेर पडत, त्यांनी राम शिंदे यांच्या मध्यमातून घरोबा केला होता. यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आठ, तर काँग्रेसच्या तीन नगरसेवकांचा समावेश होता. दरम्यान सत्तांतराच्या दृष्टीने कर्जतमध्ये पाऊल पडले. सभापती राम शिंदे यांनी काँग्रेसच्या रोहिणी घुले यांना नगराध्यक्षा, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे संतोष मेहेत्रे यांना उपनगराध्यक्ष करीत रोहित पवारांवर निशाणा साधला.

‘या’ अकरा जणांचा पक्षप्रवेश

कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले, उपनगराध्यक्ष संतोष आप्पा मेहेत्रे यांच्यासह नगरसेवक सतिष पाटील, भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, नगरसेविका ज्योती शेळके, लंका खरात, मोनाली तोटे, सुवर्णा सुपेकर, ताराबाई कुलथे, छाया शेलार यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

 

follow us