मोठी बातमी, अखेर राम शिंदे यांची तलवार म्यान, जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरलाच नाही

District Bank Election : अहिल्यानगरच्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सुरवातीच्या टप्प्यात चुरस निर्माण केलेले विधान परिषदेचे सभापती

District Bank Election

District Bank Election

District Bank Election : अहिल्यानगरच्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सुरवातीच्या टप्प्यात चुरस निर्माण केलेले विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी अखेर उमेदवारी अर्ज भरलाच नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना टाळून त्यांनी बँकेत स्वतंत्रपणे तयारी सुरू केली होती. मात्र, आता बिनविरोधच्या निर्णयातही तेही सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. शिवाय त्यांच्या बाबतीत तिसऱ्या अपत्याचा मुद्दाही अडचणीचा ठरत असल्याचे समोर आले आहे.

कोणत्याही राजकीय दबावामुळे किंवा व्यक्तिगत कारणामुळे हा निर्णय घेतलेला नसून, घटनात्मक पदाची प्रतिष्ठा आणि निष्पक्षता जपण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांनी सुरुवातीपासूनच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Ahilyanagar District Bank Election) आपण लक्ष घालणार, असे सुतोवाच केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी शिंदे यांनी अर्ज देखील घेऊन गेले होते. दरम्यान, 5 ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असल्याने राम शिंदे आज अर्ज दाखल करणार अशी माहिती देखील त्यांच्याकडून देण्यात आली होती मात्र आज त्यांनी मोठा निर्णय घेत या निवडणुकीतून माघार घेतली आहे.

जिल्हा बँक निवडणूक ही बिनविरोध व्हावी, यासाठी संगमनेर मध्ये काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी विशेष म्हणजे थोरात यांचे राजकीय विरोधक असलेले सुजय विखे हे देखील या बैठकीला उपस्थित होते. त्याचबरोबर विरोधक व सत्ताधारी एकाच ठिकाणी जमा झाल्याने व ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न करू लागल्याने सुरुवातीपासूनच या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

तर दुसरीकडे कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील राम शिंदे यांच्या तिसऱ्या अपत्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

रोहित पवार नव्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात? भाजप नेत्याचा मोठा दावा

Exit mobile version