जिल्हा बँक निवडणूक! मी अर्ज भरणार…बिनविरोधबाबत विखेंना माहिती नाही…राम शिंदेंची शाब्दिक गुगली
साधारण एकाच जागांसाठी एका पॅनल साठी 21 अर्ज तसेच 26 पॅनल हे तयार होऊ शकतात अशी सध्याची परिस्थिती आहे असे शिंदे म्हणाले.
Ram Shinde’s verbal googly : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी संगमनेर मध्ये लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली होती. मात्र या बैठकीला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे उपस्थित नव्हते. दरम्यान या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासून भूमिका घेतलेल्या शिंदे यांनी आज अर्ज घेऊन जात असताना माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया देताना म्हणाले की कर्जत जामखेड या दोन्ही तालुक्यातील माझ्या नावाचा ठराव झालेला असून मी तेथील मतदार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या वन मात्र दोन दिवसांमध्ये 541 लोकांनी अर्ज घेऊन गेलेले आहे. साधारण एकाच जागांसाठी एका पॅनल साठी 21 अर्ज तसेच 26 पॅनल हे तयार होऊ शकतात अशी सध्याची परिस्थिती आहे असे शिंदे म्हणाले.
तसेच पुढे बोलताना शिंदे म्हणाले जिल्हा बँकेच्या बिनविरोध साठी चर्चा झाली व संगमनेर मध्ये बैठक देखील पार पडली. मात्र या बैठकीबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनाच कोणतीही कल्पना नव्हती तसेच ते त्या बैठकीनंतर आतापर्यंत जिल्ह्यामध्ये उपस्थित देखील नाही. यामुळे याबाबत देखील पालकमंत्र्यांची भूमिका स्पष्टता झालेली नाही मंत्री विखे यांना बैठकीबाबत विचारात घेतले अथवा नाही याबाबत स्पष्टता नाही असं बोलत एक प्रकारे शिंदे यांनी शाब्दिक उगले टाकली.
दरम्यान या बैठकीबाबत पालकमंत्री विखे यांनी याबाबत बोललं पाहिजे तसेच आपली भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केले पाहिजे तसेच पालकमंत्री म्हणतायेत की मला याबाबत कुठलीही माहिती नाही याचा काय अर्थ घेतला पाहिजे असा प्रश्नच मतदारांच्या मनात निर्माण झाला आहे.
Gold Market : सोनं बाजारात नवा ट्रेंड… बिल घेतलं तर महाग, बिल न घेतल्यास स्वस्त?…
बैठकी बाबा शिवसेना देखील नाराजी असल्याचे बोलले जाते यावरती बोलताना शिंदे म्हणाले की माझ्या मनात देखील हाच प्रश्न तयार होतोय. पालकमंत्र्यांची भूमिका ही अनुभिज्ञ आहे यामुळे महायुतीमध्ये पालकमंत्री बैठकीबाबत माहिती नसल्याचे बोलले जात आहे. तसेच शिवसेना वेगळी बैठक घेत आहे यामुळे सभापती म्हणून मलाच भूमिका घ्यावी लागते की काय असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले ते देखील शिंदे म्हणाले.
सभासदांनी कोणाच्याही बोलण्यामध्ये एक वाक्यता नसल्याने सभासदांनी अर्ज घेऊन जाण्यास सुरुवात केली आहे कोणताही एक निर्णय घ्यायचा असेल तर सर्वसमावेशक असावा असे देखील यावेळी शिंदे म्हणाले. तसेच संगमनेर मध्ये बैठक पार पडल्यानंतर बाळासाहेब थोरात तसेच शंकरराव गडाख व विवेक कोल्हे यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. मात्र त्यानंतर कुठलीही चर्चा माझ्यासोबत झाली नसल्याचा देखील यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले.
Asian Games 2026 : नेमबाजीत भारताला सुवर्णपदक; नीरू आणि कायनान यांची चमकदार कामगिरी
कायद्यातील अडचणी व तांत्रिक बाबी ची माहिती घेऊन मी अर्ज भरणारच आहे. असं स्पष्ट वक्तव्य यावेळी राम शिंदे यांनी केले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती बिनविरोध निवडणूक व्हावी अशी बैठक ही संगमनेर मध्ये पार पडली मात्र सभासदांचा सूर हा वेगळा आहे. यामुळेच पासून अधिक फॉर्म हे अर्ज सभासद घेऊन गेले आहे. त्यानंतर पालकमंत्र्यांची भूमिका यामुळे खुद्द पालकमंत्री विखे यांनीच समोर येऊन याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना संगमनेर मधील बैठकीबाबत माहिती नसल्याचा त्यांनी म्हटले तसेच या बैठकीला भाजपचे नेते सुजय विखे हे उपस्थित होते. यामुळे या पिता-पुत्रांमध्येच अन्नभिज्ञता असल्याचे प्रथमदर्शनीय दिसून येत असल्याचे वक्तव्य देखील शिंदे यांनी केले. दरम्यान याबाबत एक वाक्यता आल्यानंतरच यावरती अधिक बोलणं योग्य राहील असं सूचक वक्तव्य देखील यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केले.