Download App

Ramdas Aathvale : प्रत्येकाने मला तोंड दाखवण्याची गरज नाही; पक्षशिस्तीवरून आठवलेंनी झाप झाप झापले

Ramdas Aathvale Angry on Party activists : शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी केंद्रीय मंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे भाषण झाले. त्यांनी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली आहे. तसेच यावेळी ते बोलत असताना त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना पक्षशिस्तीवरून चांगलचं सुनावल्याचं पाहायला मिळलं.

ब्लिडर लॉबीच्या नाड्या आवळल्या; प्रकल्पांच्या पारदर्शकतेसाठी QR कोड बंधनकारक

रामदास आठवले हे आपल्या खास कवितांसाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या कवितांना संसदेमध्ये मोठ-मोठ्या नेत्यांना हसवत चिमटे काढले आहे. पण काल मात्र ते अचानक चिडलेले दिसून आले. पक्षशिस्त, कार्यक्रम वेळेवर सुरू करण्यात आला नाही, स्टेटचे नियोजन, फोटोशूट यावरुन आठवले त्या कार्यकर्त्यांना रागवताना दिसून आले.

NVS-01 Satellite Launch : इस्त्रोची गगनभरारी! अंतराळातील खडा न खडा माहिती मिळणार

रिपब्लिकन पक्षाचा बाजार करून चालणार नाही रिपब्लिकन पक्ष किंवा मी तुमचा हार घ्यायला इथे आलेलो नाही. 10 वाजता माईक बंद करायचा आहे. सभा सुरू होण्यासाठी उशीर लागला. कारण वेळेवर येण्याची आपल्याला सवय नाही. प्रत्येकाला इतर पक्षांमध्ये असा स्टेज पाहिलाय का? अशा पद्धतीने पक्ष चालवत राहिलात तर तुम्हाला अजिबात यश मिळणार नाही. ताकदीने रिपब्लिकन पक्ष चालवायचा असेल तर फोटो काढणं वैगेरे हे सोपस्कार बंद केले पाहिजे.

ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार; राणेंच्या दाव्याने खळबळ

मी केंद्रीय मंत्री आहे आणि कोर्टाचा आगेद आहे की, 10 वाजता माईक बंद करायचा. त्यामुळे तुम्ही हार जरी आणले असतील तरी मी 7 वाजल्यापासून निघतो म्हणतोय तर मला थांबवलं जात आहे. आपण थोडी शिस्त ठेवली पाहिजे आपल्याला बाबासाहेबांचं मिशन पूर्ण करायचं आहे. केवळ फोटो काढणं आणि हार घालणं यामुळे क्रांती करता येणार नाही. प्रत्येकाने मला तोंड दाखवण्याची गरज नाही. कार्यकर्त्याने निवडूण येण्यासाठी काम केलं पाहिजे. या अगोदर आपण दलित पॅंथर होतो तेव्हा राजकीय पक्ष नव्हतो. आता आपल्या शिस्त ठेवली पाहिजे. अशा शब्दांत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना सुनावलं आहे.

Tags

follow us