मुंबई : पंतप्रधान मोदींच्या विरोधात कितीही नेते उभे राहिले तरी मोदींचा सामना करणं हे एड्यागबाळ्याचं काम नसल्याची टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांवर केली आहे. यासोबतच प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरे युतीवरही त्यांनी मोठं वक्तव्य केलं असून रिपब्लिकन ऐक्यासाठी पुन्हा एकदा आंबेडकरी नेत्यांना त्यांनी साद घातली आहे.
PM Modi : ऑस्ट्रेलियामध्ये मंदिरांवर होणारे हल्ले ही दु्:खद बाब; मोदींनी व्यक्त केला खेद
आठवले म्हणाले, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांसह इतर नेते एकत्र आले तर मी दोन पावले मागे येण्यास तयार आहे. रिपब्लिकन ऐक्यासाठी मी प्रकाश आंबेडकरांना अनेकदा निमंत्रण दिलं पण प्रकाश आंबेडकर येत नाहीत. रिपब्लिकन ऐक्य झालं तर प्रकाश आंबेडकरांचं स्वागतच आहे. आंबेडकरांसह इतर नेते सोबत आले तर मी दोन पावले मागे घेण्यास तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
तसेच ऐक्य झाल्यानंतर सर्व आंबेडकरी पक्षांकडून आम्ही एकच पक्ष रिपब्लिकन पक्षाचा असा नारा देऊ, गट करुन बाबासाहेबांचं स्वप्न साकार करता येणार नाही. अनेकदा चर्चा झाल्या मात्र चर्चेनंतरही विषय मार्गी लागत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केलीय.
Love Jihad च्या मुद्द्यावरून गदारोळ, विधिमंडळात शेलार, आव्हाड भिडले
आंबेडकरी नेत्यांसह विशेषत: वंचितचे प्रकाश आंबेडकरांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंशी केलेली युती किती दिवस टिकेल सांगता येणार नाही. आंबेडकांनी ठाकरेंशी युती केली मात्र ते महाविकास आघाडीत गेलेले नाहीत. राज्यात शिंदे-फडणवीस आणि माझी मोठी ताकद उभी असून त्यांच्यामुळे आम्हाला काही फरक पडणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
पंतप्रधान मोदींच्या विरोधात कितीही नेते उभे राहिले तरी मोदींचा सामना करणं हे एड्यागबाळ्याचं काम नसल्याचं त्यांनी म्हंटलंय. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यासह इतर राज्यामध्ये भाजपचविरोधात विरोधकांकडून रणनीती आखली जात आहे. त्यावर विरोधकांना रामदास आठवलेंनी डिवचलं आहे.
दरम्यान, देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकास सुरु आहे. नागालॅंड, मेघालय, त्रिपुरा या राज्यांत एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. यासोबतच कर्नाटक, छत्तीसगड, राजस्थानसह इतर राज्यांत भाजप एनडीएचे सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.