पुणे : महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने संगणकीकृत करून डिजिटल स्वाक्षरीत केला आहे. तसेच सध्या प्रत्येक नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध होत असलेला ७/१२ आणि शहरी भागातील मिळकत पत्रिका आता आपल्याला देशातील 22 क्षेत्रीय भाषेत पाहण्यासाठी भूलेख या लिंकवर महाभूमी पोर्टल वर उपलब्ध करण्यात आला आहे, असे पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले.
जगताप म्हणाले, यासाठीची सुविधा राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्राने (NIC) विकसित करून महाभूमी पोर्टलवर प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला आहे. त्यासाठी पुणे येथील सी-डॅक (C-DAC) विकसित केलेल्या टूलचा वापर करण्यात आला आहे. यासाठी केंद्र शासनाने सर्व राज्यांना निर्देश दिले होते त्याप्रमाणे ई-फेरफार प्रकाद्वारे संगणकीकृत झालेला व अद्यावत होत असलेला ७/१२ आता मराठी शिवाय इंग्रजी, हिंदी, संस्कृत, ओडिसी, तमिळ, तेलगु मल्याळम, बंगाली,गुजराती, पंजाबी, कानडी, आसामी, उर्दू, मणिपुरी, नेपाळी, कोकणी, डोगरी, बोडो, संथाली, सिंधी, काश्मिरी (देवनागरी) व काश्मिरी (परसो अराबिक) या २२ क्षेत्रीय भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा लाभ अनेक बिगर मराठी भाषिक नागरिकांना होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
नागरिकांनी यासाठी https://bhulekh.mahabhumi.gov.
आपला ७/१२ ‘या’ भाषेत उपलब्ध होणार
मराठी शिवाय इंग्रजी, हिंदी, संस्कृत, ओडिसी, तमिळ, तेलगु मल्याळम, बंगाली, गुजराती, पंजाबी, कानडी, आसामी, उर्दू, मणिपुरी, नेपाळी, कोकणी, डोगरी, बोडो, संथाली, सिंधी, काश्मिरी (देवनागरी) व काश्मिरी (परसो अराबिक) या २२ क्षेत्रीय भाषांमध्ये प्रजासत्ताक दिनापासून उपलब्ध करण्यात आला आहे.