Download App

Ramdas Kadam : ‘राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंनी माझ्यावर’.. कदमांचा मोठा गौप्यस्फोट

Ramdas Kadam : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटात सहभागी झालेल्या माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आताही त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबाबत मोठे खुलासे केले. कदम म्हणाले, राज ठाकरे यांच्यावर शिवसेनेत असताना खूप अन्याय झाला. उद्धव ठाकरेंना अध्यक्ष करण्याऐवजी राज ठाकरे यांना केले असते तर मराठी माणसाला न्याय मिळाला असता. राज ठाकरे यांच्याबरोबर माझे चांगले संबंध होते म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर डूख धरला. त्यांच्या संपर्कात जी माणसं होती त्यांना खाली खेचण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले, असा आरोप कदम यांनी केला.

धक्कादायक! नांदेड रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरूच; 24 तासात 6 नवजात बालकांसह 15 जण दगावले

ते पुढे, म्हणाले, उद्धव ठाकरेंबाबत एक चांगली गोष्टही आहे ती म्हणजे, ते प्रत्येक माणसाला भेटतात. परंतु, राज ठाकरे मात्र ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्याच्या बांधावरही उभे राहत नाहीत ही गोष्ट वाईट आहे. ज्यावेळी काँग्रेससोबत दुकान थाटावे लागेल त्या दिवशी मी पक्ष बंद करेन असे बाळासाहेब म्हणाले होते. आताचे नेते मात्र काँग्रेस नेत्यांचे पाय चाटतात अशी घणाघाती टीका त्यांनी उद्धव ठाकरे गटातील नेत्यांवर केली. शिवसेनाप्रमुखांच्या आशिर्वादामुळेच मी राजकारणात इथपर्यंत पोहोचल्याचेही कदम यावेळी म्हणाले.

राज ठाकरेंनीही विचार करावा

राज्यात टोलदरवाढीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावरही रामदास कदम यांनी भाष्य करत राज ठाकरेंना एक सल्ला दिला. ते म्हणाले, मनसेने टोलमुक्तीचा मुद्दा हाती घेत आंदोलन सुरू केले. हा विषय नाही. परंतु, यातून शासनाचे नुकसान होणार नाही याचा विचार राज ठाकरेंनी करावा. राज्य टोलमुक्त झालं तर मलाही आनंदच होईल, असे कदम म्हणाले.

आमची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय नको, अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल

Tags

follow us