Ramdas Kadam on Suresh Dhas Statement about NCP and Shivsena : शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेबाबत केलेल्या विधानावरून जोरदार निशाणा साधला आहे. कदम म्हणाले की, धस यांनी असं विधान केलं आहे. ज्यावर शेंबड मुल देखील विश्वास ठेवणार नाही. ते माध्यामांशी संवाद साधत होते त्यावेळी ते बोलत होते.
बेकायदेशीररित्या बुलडोझर चालवले, आता मलाही तुरूंगात डांबण्याचा कट…; निलेश लंकेचा आरोप
यावेळी बोलताना रामदास कदम म्हणाले की, भाजपमुळेच अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मतं पडली आहेत. असं विधान करणाऱ्या धसांच्या स्वप्नात तसं आलं असेल. सध्या ते प्रसिद्धीच्या झोतात आहेत. त्यामुळे त्यांना दिवसा देखील स्वप्न पडतात. तसेच आणखी प्रसिद्धी मिळवण्यासाठी देखील ते अशाप्रकारचे विधानं करत असतील पण यावर शेंबड मुल देखील विश्वास ठेवणार नाही. असं म्हणत कदमांनी निशाणा साधला आहे.
काय म्हणाले होते सुरेश धस?
भाजप आमदार सुरेश धस यांनी धाराशिव मधील परांडा विधानसभा मतदारसंघामध्ये बोलत असताना विधान केलं की, भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मत दिली आहेत. नाही तर त्यांना लोकांनी मत दिली असती का? लोकांना एक चेहरा हवा होता. तो चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा होता. असं वादग्रस्त विधान धस यांनी केलं त्यावरून त्यांच्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून टीकेचा भडीमार केला जात आहे.