Download App

Ramesh Bais : महाराष्ट्राला पुन्हा नवे राज्यपाल? रमेश बैस सक्रिय राजकारणात परतणार

  • Written By: Last Updated:

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील राज्यपाल पद हे मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. आता पुन्हा एकदा राज्यपालपदाची चर्चा सुरु आहे. राज्याचे सध्याचे राज्यपाल रमेश बैस (ramesh bais) येत्या काही दिवसात आपल्या राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशा हालचाली केंद्रीय पातळीवर सुरु असल्याच्या चर्चा आहे.

याआधी काही महिन्यापूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आणि त्याजागी रमेश बैस आले होते. आता बैस हे देखील राजीनामा देणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.त्यामुळे राज्याला नवे राज्यपाल मिळणार आहेत. राज्यात नवे राज्यपाल म्हणून कोण येणार? असा प्रश्न देखील विचारला जात आहे.

रमेश बैस पुन्हा सक्रिय राजकारणात ?

आगामी वर्षात छत्तीसगडमध्ये राज्य विधानसभेच्या निवडणुका आहेत. छत्तीसगडमध्ये भाजपकडे रमेश बैस यांच्या इतका प्रभावी चेहरा नाहीये. त्यामुळे या निवडणुकीची धुरा बैस यांच्या खांद्यावर देण्याचा भाजपचा विचार आहे. रमेश बैस हे छत्तीसगडच्या रायपूर लोकसभा मतदारसंघातून सातवेळा निवडून आलेले आहेत. शांत आणि संयमी नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत.

राहुल गांधी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना भेटणार? विरोधकांची ‘वज्रमुठ’ मजबूत

बैस यांच्या चांगल्या प्रतिमेचा आणि जनसंपर्काचा फायदा निवडणुकीत व्हावा असा भाजपचा विचार आहे. त्यामुळे बैस पुन्हा सक्रिय राजकारणात जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे राज्यात येत्या काही दिवसात सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालपद पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बैस गेले तर त्यांच्या जागी कोण येणार, असा प्रश्न आहे.

कोश्यारी यांच्यानंतर रमेश बैस

राज्याचे या आधीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांच्या कार्यकाळात नेहमीच सत्ताधारी भाजपला (BJP) पूरक भूमिका घेतल्याचा विरोधकांचा आरोप होता. महापुरुषांबद्दल त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यात वादंग उठले होते. विरोधी पक्षांनी आंदोलने करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या पार्श्वभुमीवर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. यानंतर आता रमेश बैस राज्याचे राज्यपालपदी विराजमान झाले आहेत.

लग्न कधी करणार… आदित्य ठाकरेंचे भन्नाट उत्तर…

रमेश बैस यांचा जन्म छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील रायपूर येथे झाला आहे. तब्बल सात वेळा खासदार म्हणून निवडून आलेले बैस हे देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. मात्र २०१९ मध्ये त्यांना लोकसभेचं तिकीट नाकारण्यात आले. त्यानंतर त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांना नियुक्त करण्यात आले होते.

त्रिपुरात (Tripura) दोन वर्ष राज्यपाल म्हणून काम पाहिल्यानंतर २०२१ मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर आता महाराष्ट्राचे राज्यपालपद रिक्त झाल्यानंतर त्यांच्याकडे ही धुरा सोपवण्यात आली आहे. पण नव्या राजकीय समीकरणानुसार ते देखील राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Tags

follow us